चंद्रपूरमध्ये उद्योगांसाठी ऊर्जा,संपत्ती, संसाधन आणि संधीची उपलब्धता – MLA Kishore Jorgewar
◾नियोजन भवन येथे गुंतवणूक शिखर परिषद ‘अॅडवांटेज चंद्रपूर 2025’ चे आयोजन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्हा हा केवळ नैसर्गिक संपत्तीचा खजिना नसून, उद्योगसृष्टीसाठीही अनंत संधींचे दालन उघडणारा भाग ठरत आहे. येथे कोळसा, लोखंड, चुनखडी, बॉक्साइटसारख्या खनिज संपत्तीचा मोठा साठा असून, त्याला चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन सारख्या ऊर्जेच्या स्रोतांची साथ लाभली आहे. चंद्रपूर उद्योजकांसाठी नवे दार उघडणाऱ्या आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीची दिशा ठरवणाऱ्या ठरत असून, चंद्रपूरमध्ये उद्योगांसाठी ऊर्जा, संपत्ती, संसाधन आणि संधीची उपलब्धता असल्याचे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. MLA Kishore Jorgewar
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने नियोजन भवन येथे ‘गुंतवणूक शिखर परिषद अॅडवांटेज चंद्रपूर 2025’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बल्लारशाह मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, नागपूरचे उद्योग संचालक गजेंद्र भारती, महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या, प्रशासकीय अधिकारी विवेक तांडरे, मैत्री नोडल अधिकारी पद्माकर हजारे, अशोक खडसे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, चंदू वासाडे, मेघनाथ खजानजी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, राज्यात उद्योगवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उत्तम काम केल्या जात आहे. नवे उद्योग राज्यात यावे याकरित उद्योजगांना पूरक वातावरण उपलब्ध करुन देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यसरकार करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात सुरू असलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरणनिर्मिती’च्या उद्देशाने आयोजित या गुंतवणूक शिखर संमेलनात चंद्रपूर जिल्ह्याने ऐतिहासिक यश मिळवले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून चंद्रपूरने विक्रमी 17,431 कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे. देशभरातील 12 नामवंत कंपन्यांमार्फत स्टील, माइनिंग, बायोफ्युएल, रेल्वे, डिफेन्स, केमिकल यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे 14,100 थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत ही बाब केवळ चंद्रपूरसाठीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भासाठी अभिमानास्पद असल्याचे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा संपत्तीने, संस्कृतीने आणि संधीने परिपूर्ण आहे. ही भूमी केवळ नैसर्गिक सौंदर्याने नटलेली नाही, तर प्रचंड औद्योगिक शक्यतेचा केंद्रबिंदू बनण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व गोष्टी येथे उपलब्ध आहेत. कोळसा, चुनखडी, लोखंड, बॉक्साइट ही भारतासाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय उद्योगजगतातही महत्त्वाची असलेली खनिज संपत्ती चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या खनिजांचा उपयोग लोहशुद्धीकरण, वीजनिर्मिती, सिमेंट व यंत्रसामग्री निर्मिती सारख्या अनेक उद्योगांमध्ये होतो. ही संपत्ती आपल्या मातीतच आहे. फक्त तिचा योग्य वापर करून जिल्ह्याचा औद्योगिक चेहरा उजळवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. येथे असलेले थर्मल पॉवर स्टेशन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा ऊर्जास्रोत ठरले आहे. विद्युतपुरवठ्याची ही सहज उपलब्धता म्हणजे उद्योगांसाठी एक अमूल्य संधी आहे.
चंद्रपूर हे देशाच्या मध्यभागी आहे आणि येथील वाहतूक व्यवस्था उद्योगवाढीसाठी उपयुक्त आहे. चंद्रपूरचा तरुण वर्ग हा मेहनती, जिद्दी आणि शिकण्यास उत्सुक आहे. योग्य दिशा व प्रशिक्षण दिल्यास हे युवक कोणत्याही उद्योगासाठी आधारस्तंभ ठरू शकतात. नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणपूरकतेने नटलेल्या या जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प, घनदाट जंगलं व जैवविविधतेने समृद्ध परिसर आहे. त्यामुळे या जिल्ह्याला हरित उद्योगांसाठी अत्यंत योग्य वातावरण लाभले असून, चंद्रपूर सारखे शहर ग्रीन इंडस्ट्रीसाठी आदर्श उदाहरण ठरू शकते, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.या कार्यक्रमाला उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments