Hansraj Ahir वेकोलि ( WCL ) वणी क्षेत्र अंतर्गत जमीन अधिग्रहणाबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तत्परतेने मार्ग काढा - हंसराज अहीर

 






Hansraj Ahir वेकोलि ( WCL ) वणी क्षेत्र अंतर्गत जमीन अधिग्रहणाबाबत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तत्परतेने मार्ग काढा - हंसराज अहीर

◾स्थानिक युवकांसाठी ऑपरेटर ट्रेनिंग कार्यक्रम राबवून शासन निर्णयानुसार 80 टक्के रोजगार प्रदान करावा.

◾गाडेगांव एक्सपॉन्शन ओसीएम परियोजनेतील उर्वरित जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठवणार


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दि. ०८ एप्रिल रोजी वणी क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय, उर्जाग्राम, ताडाली येथे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे द्वारे वणी क्षेत्राशी संबंधित जमीन अधिग्रहण, रोजगार, ओव्हर बर्डन कंपनीमध्ये स्थानिक युवकांना शासन निर्णयानुसार ८० टक्के रोजगार, एचपीसी वेजेस व कामगारांचे इतर प्रश्न, गाडेगाव ओसीएम परियोजनेतून सेक्शन ७ नंतर सुटलेली जमीन अधिग्रहण, निलजई परियोजनेतून सुटलेली उकणी येथील जमीन अधिग्रहण व पुनर्वसन, खाण परिसरातील कोळसा चोरी व वाढती गुन्हेगारी यावर मर्यादा आणण्यासाठी ड्रोन सेवेचा वापर, नविन प्रस्तावित परियोजनांची विद्यमान स्थिती, गावांचे पुनर्वसन, ५ वर्ष मर्यादेसाठी प्रलंबित नोकरी प्रस्ताव, न्यायालय प्रलंबित नोकरी प्रस्ताव या व अन्य विषयांवर बैठक पार पडली.

                मुख्यमहाप्रबंधक वेकोलि, वणी क्षेत्र आभासचंद्र सिंग, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक बिनेज कुमार, सुजित कुमार पिशारेड्डी महाप्रबंधक संचालन, संजय जामगडे क्षेत्रीय नियोजन अधिकारी तसेच संजय तिवारी, मनोहर झाडे सरपंच गाडेगाव, शाम कनकम, यांचेसह गाडेगाव, विरूर, बोरगाव तसेच विविध परियोजनेतील प्रकल्पग्रस्तांची बैठकीत उपस्थिती होती.

                निलजई प्रकल्पात उकणी येथील उर्वरित जमीन अधिग्रहणबाबत प्रस्ताव मुख्यालयाला पाठवण्यात आल्याची तसेच गावाच्या पुनर्वसनाच्या संदर्भात बेस लाईन सर्वे झालेला असल्याची माहिती प्रबंधनाद्वारे देण्यात आली. तसेच गाडेगाव एक्सपॉन्शन ओसीएम प्रकल्पात सेक्शन ७ साठी गेलेल्या ६६५ हेक्टर जमिनीपैकी सोनुर्ली १० हेक्टर, विरूर ४० हेक्टर, जमीन सेक्शन ९ च्या वेळेस कमी करण्यात आल्याचा विषय या दरम्यान चर्चेला आला. आणि या उर्वरित जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव सदर बैठकीचा संदर्भ देवून वेकोलि मुख्यालयाला पाठविण्यात यावा असे निर्देश मा. महोदयांनी दिले.

                विरूर गावाच्या पुनर्वसन संदर्भात उर्वरित ६५ परिवारांना मुख्यतः प्लॉट देण्यात यावे किंवा याबद्दल्यात मिळणारा मोबदला वाढीव स्वरूपात देण्यात यावा याबाबत प्रस्ताव तयार करून वेकोलि मुख्यालयाला पाठविण्याचे निर्देश अहीरांनी दिले. तसेच वणी क्षेत्रामध्ये प्रस्तावित प्रकल्प ज्यामध्ये, कोलगांव परियोजना सेक्शन ११ साठी, गाडेगाव एक्सपॉन्शन ओसीएम परियोजना सेक्शन ९ साठी, मुंगोली नॉर्थ एक्सटेन्शन सेक्शन ४ साठी प्रस्तावित तर निलजई डिप हा प्रकल्प सुध्दा भविष्यात होणार असल्याची माहिती क्षेत्रीय महाप्रबंधक यांनी दिली.

                विविध प्रकल्पातील अर्थहिन न्यायीक दाव्यांमुळे प्रलंबित असलेल्या नोकरी प्रस्तावांची छानणी करून सातबारा धारकांच्या बाजुने गुणवत्ता प्राप्त दाव्यातील रोजगार प्रस्ताव क्षतीपुर्ती बंधपत्र दाखल करून मंजूर करण्यासाठी वेकोलि मुख्यालयाला प्रेषित करावे असेही हंसराज अहीर म्हणाले.

                वेकोलि अधिनस्त कार्यरत असलेल्या ओव्हर बर्डन कंत्राटी कंपन्यांमध्ये रोजगार देतांना राज्यशासनाच्या ८०:२० प्रमाणात स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याच्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन करण्याबाबत प्रबंधनाने पावले उचलावित यासाठी ऑपरेटर ट्रेनिंग कार्यक्रम वेकोलि प्रबंधनाच्या माध्यमातून राबवण्यात यावा व स्थानिक युवकांना वॉल्वो/आयशर या कंपनीमध्ये कार्यरत गाड्यांवर ऑपरेटर म्हणून सक्षम करून रोजगाराची संधी द्यावी. तसेच सुपरवायझर, हेल्पर यामध्ये सुध्दा स्थानिक डिप्लोमा, आयटीआय धारक युवकांना प्राधान्य देण्याच्या तसेच कामगारांना एचपीसी वेजेस, नियमित तारखेला वेतन व वैद्यकीय सुविधा देण्याच्या सुचना आयोगाच्या  माध्यमातून करण्यात आल्या.

                बैठकीला मारोती पिंपळकर, रविदास करमनकर, संजय राव, सुनिल पाचभाई, निलेश राव, तासिंग चंदेल, विलास चौधरी, महादेव नभिलकर, प्रणय डंभारे, आशय चंदनखेडे यांचेसह अन्य प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments