श्री महाकाली मंदिर परिसरात १०१ माता भक्तांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण Chandrapur
◾चंद्रपुरात चैत्र पौर्णिमेनिमित्त ५१ फूट ध्वजाचे भव्य ध्वजारोहण
◾भारतीय जनता पार्टी आणि श्री महाकाली माता महोत्सव समितीचे आयोजन
चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चैत्र पौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने सकाळी ८ वाजता श्री महाकाली मंदिर परिसरात १०१ माता भक्तांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माता महाकालीची चांदीची मूर्ती, रथ आणि पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार, मनिष महाराज, सुनील महाकाले, श्री महाकाली माता ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त श्याम धोपटे, मिलिंद गंपावार, राजू शास्त्रकार, तुषार सोम, भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबुलकर, प्रदीप किरमे, वंदना हातगावकर, संजय बुराघाटे, अरुण तिखे, राजेंद्र खांडेकर, अनिल तहलानी, जितेश कुळमेथे, निलीमा वनकर, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, रुपा परसराम, वंदना हजारे, अनिता झाडे, चंपा विश्वास, दीक्षा सातपुते, चंदा ईटनकर, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, नितीन शाहा, कालिदास धामणगे, करणसिंग बैस, प्रविण गिलबीले, मुन्ना जोगी, संजय महाकालीवार, सुमित बेले, कैलास धायगुने, चंद्रकांत बातव, प्रशांत दिवेदी आदींची उपस्थिती होती.
यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उत्सवाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाकाली माता ही शक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त आपण येथे एकत्र आलो आहोत, हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. ५१ फूट उंच ध्वज हा आपल्या भक्तीची आणि परंपरेची साक्ष आहे. हजारो भक्तांनी दिलेला भावपूर्ण सहभाग, चंद्रपूरची सांस्कृतिक श्रीमंती दर्शविणारा आहे. दरवर्षी नवरात्रात आपण महाकाली महोत्सव साजरा करतो. यावेळी रथातून मातेची भव्य पालखी मिरवणूक निघते. चैत्र यात्रेत येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी रथ आणि पालखीची विधीवत पूजा करून ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला मातेच्या भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments