जीवाचे बरे वाईट झाल्यास पोलिस प्रशासन व आरोपी, वकील जिम्मेदार

 









जीवाचे बरे वाईट झाल्यास पोलिस प्रशासन व आरोपी, वकील जिम्मेदार  

◾पत्रपरिषदेत पीडित एकनाथ जेंगठे यांची न्यायाची मागणी  

चंद्रपूर( राज्य रिपोर्टर न्युज ) : गोंडपिंपरी तालुक्यातील मौजा चक विठ्ठलवाडा तांडा येथील रहिवासी असलेले एकनाथ सोमाजी जेंगठे हे शेतकरी असून ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गावातील व्यक्तिकडून जमीन विकत घेने हे काही लोकांना हे बघविले नसल्याने गांवात पागल असल्याचे सांगून अफवा पसरवत, जीवंत मारण्याची धमकी देऊन गांवातुन हाकलून दिले आहे. यादरम्यान त्याचा परिवार त्याला सोडुन गेला. कुटूंब बरबाद झाले. मला वेडा ठरवुन जिवंत मारण्याची धमकी देणा_या आरोपींवर कारवाई करून न्याय करावा आणि जीवाचे बरेवाईट झाल्यास पुलिस प्रशासन, आरोपी आणि आरोपींचे वकीलांना जिम्मेदार राहील अशी मागणी पीडित एकनाथ जेंगठे ने पत्रपरिषदेत केली आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील मौजा चक विठ्ठलवाडा तांडा येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचे एकनाथ जेंगठे यांनी सांगितले. या काळात त्यांनी गावातील जनार्दन विस्तारी राऊत यांच्याकडून ५ हजार चौरस फूट गावठानातील जागा खरेदी केली. पण शेजारील गांवातील लोकांना जागा घेतल्याचे सहन न झाल्याने ती जमीन सोडण्यासाठी ठार मारण्याची आणि गाव सोडून जाण्याची धमकी देत ​​आहेत. या संदर्भात पोलिस प्रशासन, मानवाधिकार आयोग आणि ग्रामपंचायत सरपंच सचिवांकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु आरोपींचे वकील एड. मंगेश काळे वारंवार खटला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. गावातील आरोपी आटा रविंद्र लिंगे, श्रीकांत मासिरकर, धम्मदिप मेश्राम, आसीम शेख, असीम बैनर्जी, शंकर मन्ने ने एकनाथला वेडा ठरवले आणि गावात त्याची बदनामी केली, यादरम्यान त्यांची पत्नी आणि मुले त्याला सोडून गेली. शेती ओसाड झाली. एकनाथचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. पोलिस प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही आरोपींवर कायदेशीर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. गावात परत गेल्यास आरोपींकडून एकनाथच्या जीवाला धोका आहे. स्वता:च्या जीवाला काही नुकसान झाल्यास संबंधित गावातील उक्त आरोपी, पोलिस प्रशासन आणि आरोपीचें वकीलाला जिम्मेदार धरावे आणि न्याय करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. 

पत्र परिषदेत बोरी सरपंच विनोद ओल्लुरपूर आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments