वरुर, विरुर, धानोरा, चिंचोली व अंतरगाव राज्यसीमेपर्यंत मार्गाच्या दुरुस्तीसाठी चक्काजाम आंदोलन

 






वरुर, विरुर, धानोरा, चिंचोली व अंतरगाव राज्यसीमेपर्यंत मार्गाच्या दुरुस्तीसाठी चक्काजाम आंदोलन 

राजुरा ( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजुरा, वरुर, विरुर, धानोरा, चिंचोली व अंतरगाव आणि राज्यसीमेपर्यंत मार्गाच्या दुरुस्तीसाठी व रुंदीकरणासाठी आज वरुर रोड येथे धरणे व चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी परिसरातील सर्व गावचे सरपंच मोठ्या संख्येमध्ये शेतकरी युवक वर्ग व महिला भगिनी उपस्थित झाल्या याप्रसंगी अनेकांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले व निदर्शने केले सदर रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त व कमी रुंदीचा असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असून या मार्गाने ग्रामीण रुग्णांना देखील अतिशय त्रास होत आहे. 

यामुळे या भागातील लोकांची मानसिकता खराब होऊन आज या आंदोलनात जनता उतरली रस्त्यावर उतरून आंदोलन केले प्रशासनाला निवेदन दिली तरी देखील प्रशासनाने याची गंभीर्याने दखल न घेता लोकांना रस्त्यावर उतरावा लागला ही खंत लोकांनी या ठिकाणी व्यक्त केली.

 मागील अनेक वर्षापासून या मार्गाची दुरावस्था असून अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी नियमित होत आहे या मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली सरपंच अनिल आलम , सुरेखा आत्राम, इंदिरा मेश्राम,मंदा किनाके,शंकर आत्राम,आनंदर आत्राम,अजय रेड्डी, अविनाश जाधव, बापू धोटे कुंदा जेनेकर,सरिता रेड्डी अविनाश रामटेके,प्रवीण चिडे, राजकुमार ठाकूर अरुण सोमलकर अजित सिंग रवी चांदेकर भास्कर श्रीराम, प्रीती पवार, बबन ताकसांडे,अजितसिंग टाक,चेतन जयपुरकर, रामदास नकावार, प्रदीप बोबडे,प्रदीप बोटपल्ले,संतोष चौधरी,सुदर्शन जणेकर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते सार्वजनिक बांधकामाचे उप विभागीय अभियंता पुल्लावार व नायब तहसीलदार यांनी लोकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारली.




Post a Comment

0 Comments