आज चंदेल यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
◾500 लोकांचे रक्त दान करण्याचे लक्ष
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त, रक्तदान सेवा समिती बल्लारपूर तर्फे आज सोमवार, ७ एप्रिल रोजी स्थानिक एकदंत लॉन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा सोबतच संध्याकाळी 7 वाजता दिव्यांगाचा ऑक्रेस्ट्रा आणि चंद्रनसिंह चंदेल यांचा स्वागत समारोह आयोजित आहे.
सरकारी रुग्णालये आणि खाजगी रक्तपेढ्यां मध्ये रक्त उपलब्ध नाही. रक्त बाहेरून आणले जात आहे. जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. केवळ रक्तदान करूनच गरजू रुग्ण किंवा जखामी व्यक्तीला जीवनदान देता येते.
ही परिस्थिती लक्षात घेता, चंदनसिंग चंदल यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी ररक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात कनण्यात येते. या वर्षी 500 लोकांचे रक्त दान करण्याचे लक्ष आहे. सर्व इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे आणि रक्तदान करून या मानवी सेवेच्या कार्यात आपले मौल्यवान योगदान द्यावे. असे आवाहन रक्तदान सेवा समिति बल्लारपुर यांनी केले आहे.
0 Comments