पोलिसांना मारहाण करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल

 









पोलिसांना मारहाण करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल

◾भिसी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

◾पत्रकार व व्यापारी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा यातील आरोपी यांनी मारहाण केली.

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना मारहाण करण्याची घटना दिनांक. २५/०४/२०२५ ला घडली असून घटनाक्रम अशाप्रकारे आहे कि फिर्यादी नामे पोलीस अंमलदार बक्कल नंबर 2587 मनोज गायकवाड यांची शासकीय वाहनावर चालक म्हणून ड्युटी असताना सकाळी ०८:०० वाजता ड्युटी ऑफिसर म्हणून कर्तव्यावर हजर असलेले पोलीस अंमलदार राजू बावणे यांना फोन द्वारे दुपारी वेळ ०३:३० वाजता माहिती मिळाली की भट्टी चौक भिसी येथील जैस्वाल बारचे समोर काही व्यक्ती दारू पिऊन आपसात झगडा भांडण करीत आहे.

 अशी माहिती मिळाल्यावरून फिर्यादी व त्यांचे सोबत डीओ म्हणून ड्युटीवर कार्यरत असणारे पोलिस अंमलदार राजू बावणे हे सदर घटनास्थळाच्या ठिकाणी दुपारी वेळ ०३:४५ वाजता जाऊन झगडा भांडण करणाऱ्या इसमांना शांत करून समजविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातील नमूद आरोपींनी चालक पोलीस अंमलदार मनोज गायकवाड यांना हाता भुक्क्यांनी मारहाण केली व पोलिस अंमलदार राजू बावणे यांना सुद्धा धक्काबुक्की केली. तसेच सदर ठिकाणी हजर असलेले पुनम वस्त्रालयाचे मालक तथा पत्रकार पंकज मिश्रा यांनी सुद्धा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा यातील आरोपी यांनी मारहाण केली.हे मारहानीचे प्रकार सायंकाळी वेळ ०६:१५ वाजता पर्यंत चालले नंतर पोलीस अंमलदार राजू बावणे यांनी मदतीकरिता पोलीस स्टेशनला फोन करून मोठ्या प्रमाणात पोलीस स्टाफ हजर झाल्याने सदर झगडा भांडण करणारे इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.

पोलीस अंमलदार बक्कल नंबर 2587, मनोज गायकवाड यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे (१) विकास गोपाल नंदुरकर व 33 वर्ष, (२) मनीष उर्फ शिवम लक्ष्मण गजपुरे वय 19 वर्ष, (३) विनोद उर्फ सर्वेश सुरेश ढोमणे वय 26 वर्ष, (४) होमराज सुधाकर ढोमणे वय 23 वर्ष, (५) स्वप्निल अमृत करंडे  वय 26 वर्ष, (६) संदीप अमृत करंडे व 29 वर्ष, (७) मुन्ना राजू बाळबुदे वय 24 वर्ष, (८) साहिल ज्ञानेश्वर भूडे वय 25 वर्ष ,सर्व राहणार पेंढराबोडी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर, (९) सूर्यभान ईश्वर चौधरी वय 39 वर्ष राहणार दुर्गापूर शाळेजवळ वार्ड नंबर सहा तालुका उमरेड जिल्हा नागपूर, (१०) विधी संघर्ष बालक नामे नैतिक लक्ष्मण गजपुरे  राहणार पेंढराबोडी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर यांचेवर अपराध क्रमांक 54/25 कलम 132,121(1),189,190,191(2),351(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपींना अटक करण्यात आली. असून दिनांक. २६/०४/२०२५ रोजी आरोपी असलेल्या सर्वांना पोलीस कोठडी रिमांड कामी न्यायालयात हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे हे करीत आहे.




Post a Comment

0 Comments