विद्याश्री कॉन्व्हेंटमध्ये दीक्षांत समारंभ मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : विद्याश्री कॉन्व्हेंटमधील वरिष्ठ u k g च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ गुरुवार २४/०४/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली. नर्सरी, lkg आणि ukg च्या छोट्या विद्यार्थ्यानी रंगारंग नृत्य प्रस्तुत केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या श्रीमती प्रियांका करवंदे, विद्याश्री कॉन्व्हेंटचे हितचिंतक श्री. संजय गुप्ता, पत्रकार श्री. वसंत खेडेकर उपस्थित होते. या प्रसंगी शाळेचे संस्थापक श्री. कैलाश खंडेलवार यांनी मुलांचे मनोबल वाढवले आणि त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु. अंजली ठाकूर, हेमलता खेंगर व ९ वीच्या विद्यार्थिनी कु.भूमिका ढोके, कु.खुशबू धोटे यांनी केले. कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त कु.सविता सोनावानी यांनी केले.
0 Comments