महिला सशक्तिकरण हे आरोग्याच्या दिशेने ठाम पावले – डॉ. कल्पना गुलवाडे

 









महिला सशक्तिकरण हे आरोग्याच्या दिशेने ठाम पावले – डॉ. कल्पना गुलवाडे

 ◾स्त्री रोग व प्रसूती रोग तज्ञ डॉक्टर संघटनेच्या अध्यक्षपदाचा  पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न


चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर येथील स्त्री व प्रसूती रोग तज्ञ संघटना यांच्या नवनिर्वाचित अध्यक्षा म्हणून डॉ. कल्पना गुलवाडे यांनी पदभार स्वीकारला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील स्त्री व प्रसूती रोग विभागाच्या विभाग प्रमुख व प्राध्यापिका डॉक्टर अलका पाटणकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी डॉ. कल्पना गुलवाडे यांनी अध्यक्षीय पदभार स्वीकारल्यानंतर आगामी वर्षासाठी समाजोपयोगी, आरोग्यविषयक व महिला सशक्तिकरणाच्या दिशेने एक नवा संकल्प सादर केला.

 माझे आरोग्य माझ्या हाती

 या ब्रीदवाक्यानुसार संपूर्ण महिलांचे आरोग्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलून वजन, रक्तदाब, रक्त शर्करा व हिमोग्लोबिन या बाबींची माहिती असणं आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी कमतरता असेल त्या ठिकाणी योग्य तो उपचार करून स्वतःला निरोगी ठेवणे हा उत्तम आरोग्याचा  मूलमंत्र आहे असे डॉक्टर कल्पना  म्हणाल्या.

 प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉक्टर अलका पाटणकर यांनी संपूर्ण चमूला  शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मनीषा घाटे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. संघटनेच्या मागील दोन वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा डॉ. मनीषा वासाडे यांनी सादर केला. डॉ. नगीना नायडू यांनी कोषाध्यक्ष म्हणून आपले मनोगत व्यक्त केले, तर डॉ. ऋचा पोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास IMA चे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, अध्यक्ष डॉ. संजय घाटे, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित यांची विशेष उपस्थिती होती. तसेच वणी येथील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुलभा मुंजे यांना लाइफटाईम अचीव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांमध्ये IMA माजी अध्यक्ष डॉ. राजीव देवेकर, डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. किरण देशपांडे, डॉ. राजलक्ष्मी यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

नवीन कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे:

अध्यक्ष – डॉ. कल्पना गुलवाडे,सचिव – डॉ. ऋचा पोडे,कोषाध्यक्ष – डॉ. श्वेता मानवटकर,उपाध्यक्षा – डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. समृद्धी आइंचवार, डॉ. ऋजुता मुंदडा, डॉ. पूनम नगराळे,सहसचिव – डॉ. शुभांगी वासाडे, डॉ. प्रियांका पालीवाल, डॉ. शिल्पा नाईक, डॉ. अनुप बांगडे, डॉ. दिपाली मुसळे  क्लीनिकल सचिव – डॉ. प्रिया शिंदे,सांस्कृतिक सचिव – डॉ. मोनिका कोतपल्लीवार आणि मार्गदर्शक – डॉ. कीर्ती साने हा कार्यक्रम एकूणच संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचा आणि महिलांच्या आरोग्य उन्नतीसाठीच्या कटिबद्धतेचा प्रतीक ठरला.





Post a Comment

0 Comments