सामाजिक न्याय समता सप्ताह व पर्वाचा शुभारंभ
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी पर्वावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय समता सप्ताह व सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी 11 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन चंद्रपुर येथील सांस्कृतिक सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली व संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. तसेच उपस्थित वक्त्यांना संविधान पुस्तकाची भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, तर वक्ते म्हणून समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य जयश्री कापसे, नरेंद्र गेडाम, प्रा. कोमल खोब्रागडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कार्यालयातील कर्मचारी समतादूत व मोठ्या संख्येने विद्यार्थी, लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी तर आभार वर्षा कारेंगुलवार यांनी मानले.
0 Comments