पत्रकार हा समाजाचा आरसा आहे - आमदार किशोर जोरगेवार
◾साप्ताहिक तथा पोर्टल वर्धापन दिनाचा आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार यांच्या सन्मान
◾पक्षपात न करता आपले स्वच्छ लिखाण करावे.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील जनतेचा तो विश्वास आहे. त्यामुळे पत्रकारानी पक्षपात न करता, सत्यासाठी खरे ते खरे आणि खोटे ते खोटे लिखान करावे असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर यांनी वज्रयुध्द साप्ताहिक तथा पोर्टल च्या वर्धापन दिनाचे निमित्ताने कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
चंद्रपूर येथे वज्रयुध्द साप्ताहिक तथा पोर्टल वर्धापन दिनाचा आयोजित कार्यक्रम सभागृहात घेण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर यांनी उपस्थित दर्शविली . तसेच मंचावर उपस्थित खोमदेव तुम्मेवार, जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार, नथमल सोनी, गजानन हिरेमठ,व किशोर भाऊ जोरगेवार यांचे कार्यकर्ते आदीं प्रमुख पाहुणे उपस्थिती होती.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री. किशोरजी पोतनवार, श्री. नथमलजी सोनी तथा श्री. गजाननजी हिरेमठ सन्मानित ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करून सन्मानचिन शाल श्रीफळ देऊन मा. आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी बोलताना आमदार किशोर भाऊ जोरगेवार म्हणाले की काही गरीब विद्यार्थ्यांचे पालकांचा आकस्मिक मृत्यू होतो. अशावेळी त्या कुटुंबावर आघात होते. कुटुंबातील मुलांना पुढील शिक्षण घेता येत नाही. मुलाचे शिक्षण बंद होते. त्यामुळे अशा मुलांचे पूर्ण शिक्षण करण्यासाठी आम्ही "अम्मा की पढाई "असा नवा उपक्रम केला आहे. या माध्यमातून मुलाचे शिक्षण तर पूर्ण होईल. हजारो विध्यार्थीचे भविष्य उजाडेल, कुटुंबातील सदस्यला मदत होईल असा संदेश कार्यक्रमा प्रसंगी दिला आहे. या आधी "अम्माका टिफीन" घरापर्यंत पोहोचवून भूक भागविण्यासाठी मदत केली आहे. आजही तो उपक्रम सुरूच आहे.
वज्रयुध्द साप्ताहिक तथा पोर्टल च्या वर्धापन दिन यशस्वी होण्यासाठी कविता ढगे, साहिल मामीडवार, सचिन ढगे, कुणाल कारगिलवार, अक्षय जीजिलवार, राजू नगराळे, राजू नगराळे आदिनी परिश्रम घेतले.
0 Comments