7 व 8 एप्रिल रोजी विशेष तपास पथकाकडे करता येणार तक्रार
◾मद्य परवाने गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीच्या प्रकरणी तपास
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाने मंजुर करतांना मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीच्या प्रकरणी तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे.
तपासाच्या अनुषंगाने 7 व 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विशेष तपास पथक (SIT) अध्यक्ष संदिप दिवाण हे तपास पथकासह चंद्रपूर विश्राम गृह येथे येत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यानंतर (शासन अधिसूचना दिनांक 8 जून 2021 नंतर) जिल्ह्यात नुतनिकरण करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या / इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2 इ.) या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेल, अशा व्यक्ती / तक्रारदार हे त्यांचेकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास (SIT) 7 व 8 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेस चंद्रपूर विश्राम गृह येथे समक्ष येवून भेटु शकतात, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.
0 Comments