बल्लारपुर तहसीलदार व तलाठी यांचे विरूध्द 2,20,000 लाचेच्या मागणी

 






बल्लारपुर तहसीलदार व तलाठी यांचे विरूध्द 2,20,000 लाचेच्या मागणी   

◾अॅन्टी करप्शन ब्युरो,चंद्रपूर तर्फे कारवाई

◾कोणतीही कारवाई न करण्याकरीता तहसीलदार यांचेकरीता २ लाख रू. तलाठी करीता २० हजार रू.  

◾एकुण २ लाख रू. २० हजार रू. लाचेची मागणी केली. 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपुर तहसील येथे  तक्रारदार हे मौजा कोठारी, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन बिल्डींग मटेरिअल सप्लायर चा व्यवसाय करतात. तक्रारदार यांची मौजा कवडजई, ता. बल्लारशाह येथे शेती असुन दि. २३/०३/२०२५ रोजी २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. च्या सहाय्याने त्यांचे शेतातील माती/मुरूम काढून शेताचे लेवलींग चे काम करीत असतांना कवडजई साजाचे तलाठी सचिन व बल्लारशाह तहसीलचे तहसीलदार श्री. गायकवाड यांनी तक्रारदार यांना माती/मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने शेतात असलेले २ ट्रक्टर व १ जे.सी.बी. जप्त न करण्याकरीता तसेच तक्रारदार यांचेवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता तहसीलदार यांचेकरीता २ लाख रू. तलाठी करीता २० हजार रू. असे एकुण २ लाख रू. २० हजार रू. लाचेची मागणी केली. तसेव त्याचदिवशी तलाठी सचिन व तहसीलदार श्री. गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडून १ लाख १९ हजार ९०० रू. स्विकारले. मागणी केलेल्या रक्कमेपैकी उर्वरित १ लाख रु. देण्याकरीता तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडे तगादा लावण्याने तक्रारदार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून दि. २६/०३/२०२५ रोजी ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दि. २६/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार, तहसील कार्यालय बल्लारपूर (वर्ग १) यांनी दिलेल्या प्रोत्साहनावरून आलोसे सचिन रघुनाथ पुकळे, तलाठी- कवडजई साजा, ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर (वर्ग ३) यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती ९० हजार रू. मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवीली. त्यावरून आज दि. ०१/०४/२०२५ रोजी सापळा कारवाई करीता तक्रारदा यांना आलोसे अभय गायकवाड यांचेकडे पाठविण्यात आले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यावरून आज दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पो.स्टे. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असुन आलोसे अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार याना ताब्यात घेण्यात आले असुन आलोसे सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने शोध पथक रवाना करण्यात आले. सदरची कार्यवाही ही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पो.अं. अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय नागपुर फोन क्र. ०७१२-२५६१५२० लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर फोन क. ०७१७२-२५०२५१ टोल फ्री नंबर- १०६४

श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उप अधीक्षक ९३२२२५३३७२ श्री. जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक ८८८८८५७१८४

Website www.acbmaharashtra gov in




Post a Comment

0 Comments