विधी महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा Shantaram Potdukhe College of Law
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाद्वारे Shantaram Potdukhe College of Law दि. 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ऐजाज शेख, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी विधी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. अंजली हस्तक, पदवीत्तर विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज काकडे, एल. एल. बी. तिन वर्षीय अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अभय बुटले यांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती म्हणून लाभलेल्या महाविद्यालयातील गुणवंत आणि नामवंत विद्यार्थ्यांच्या माता ज्योती तानेजा, प्रमिला गिरी, कमलाताई शृंगारे, छायाताई देवपूजारी, आशाताई टोंगे, सुधाताई अलोणे हया प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित महाविद्यालायाच्या प्राध्यापिका डॉ. मार्गवी डोंगरे, डॉ. मृणाल भासारकर, डॉ. सुवर्णा मंगरूळकर, डॉ. अश्विनी बल्की, ऍड. प्रिया पाटील, ऍड. नंदिथा नायर, ऍड. शिल्पा दिवटे, ऍड. दिपा मोरे, प्रा. रेणू काटकर, प्रा. सरोज कुमार दत्ता, प्रा. पूर्णेदू कार, प्रा. नंदकिशोर भंडारी, प्रा. पवन गुजर, प्रा. सुबोध मेश्राम, प्रा. संजय तरवटकर तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयाच्या महिला समितीद्वारे दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववाण महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. या वर्षी महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमात विद्यापीठातून सर्व प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आईचा गौरव करण्याचा प्रस्ताव आदरणीय प्राचार्य यांनी मांडला, तसेच वकिली व्यवसायात आणि न्यायलयीन अधिकारी म्हणून कार्यरत माजी विद्यार्थी यांच्या आईचा गौरव करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या वर्षी न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळविलेल्या माजी विद्यार्थिनी मंजुषा अलोणे यांच्या मातोश्री सुधाताई अलोणे, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात स्वकर्तृत्वावर वकिली व्यवसायात नावलौकिक प्राप्त केलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ऍड. वैशाली टोंगे यांच्या मातोश्री आशाताई टोंगे यांच्या मातृत्वाचा गौरव करणार आला. या सोबतच बी. ए. एल. एल. बी. पाच वर्षीय अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त कु. ईशा तानेजा यांच्या मातोश्री ज्योती तानेजा, एल. एल. बी. अभ्यासक्रमात प्रथम आलेले आकाश गिरी यांच्या मातोश्री प्रमिलाताई गिरी, एल. एल. एम. या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त अनिल शृंगारे यांच्या मातोश्री कमळाबाई शृंगारे, गतवर्षी प्राविण्यप्राप्त विद्यार्थी कैवल्य देवपूजारी यांच्या मातोश्री छायाताई देवपूजारी या सर्व मातांचा त्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी केलेल्या कर्तृत्वाचा हा गौरव सोहळा संपन्न झाला. खरं तर या सर्व आईनी आपल्या मुलांना घडविण्यासाठी घेतलेले श्रम, केलेला त्याग त्याच्या तुलनेत हा सत्कार खूप छोटा आहे, पण कुठेतरी या आईच्या त्यागाचा सन्मान करावा हाच या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे मत प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माजी प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यांनी मातृत्व म्हणजे एक अतुलनीय आणि मातृत्वाचा गौरव हा एक कौतुकास्पद उपक्रम असल्याचे मनोगत व्यक्त केले. सर्व सत्कार मूर्तिचे भेटवस्तु, सन्मान चिन्ह प्रदान करून मान्यवारांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. आशाताई टोंगे तसेच प्रा. युवराज अलोणे यांनी या सन्मान सोहोळ्याबदल कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयातील महिला समिती प्रमुख प्रा. डॉ. मनीषा आवळे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकपर भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. लीना लंगडे यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. शिल्पा दिवाटे यांनी केले.
0 Comments