MLA Kishor Jorgewar जनता दरबार: नागरी समस्या सोडविण्याचा प्रभावी मंच – आ. किशोर जोरगेवार
◾घुग्घूस येथे जनता दरबार, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांनी मांडल्या समस्या
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. स्नेहप्रभा मंगल कार्यालयात झालेल्या या जनता दरबारात घुग्घूसवासीयांनी अधिकाऱ्यांसमक्ष आपल्या समस्या मांडल्या. यावेळी आलेल्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जनता दरबार हा केवळ समस्या मांडण्याचा नव्हे, तर त्या सोडवण्याचा प्रभावी मंच आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा कमी करून प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निलेश रांजनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश अमरशेट्टीवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, महावितरण विभागाचे अभियंता पेंदोर, वेकोलीचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक रेड्डी, आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी तसेच घुग्घूसचे माजी सरपंच संतोष नुने, उपसरपंच संजय तिवारी, माजी जिल्हा परिषद सभापती नितू चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विवेक बोढे, इमरान खान, सुधाकर रेड्डी, राजकुमार गोडशेट्टीवार, सुनिता गिवे, स्वप्निल वाढई, मुन्ना लोढे, उषा आगदारी, मयुर कलवल, विशाल दामेर, श्याम आगदरी, विनोद चौधरी, वनिता निहाल, अनिल बाम, निरिक्षण तांड्रा, कुसुम सातपूते, साजन गोहणे, नितू जैस्वाल, सविता गोहणे, सिनु रामटेके, विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, नंदकिशोर यादव, राहुल झाडे आदींची उपस्थिती होती.
घुग्घूस शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्नेहप्रभा मंगल कार्यालयात आयोजित जनता दरबार मोठ्या प्रतिसादात पार पडला. या दरबारात शेकडो नागरिकांनी हजेरी लावून स्वतःच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रशासनाच्या वतीने विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहिल्याने नागरिकांच्या अडचणी तत्काळ नोंदवून त्यावर उपाययोजना करण्यास गती मिळाली. जनता दरबारात पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, वेकोलीशी संबंधित तक्रारी, वसाहतीतील नागरी सुविधा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उत्तर देत काही तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
घुग्घूसच्या नागरिकांनी आपले प्रश्न प्रामाणिकपणे मांडले. मात्र, प्रश्न उपस्थित करणे हेच शेवटचे पाऊल नाही, तर त्यावर तोडगा काढणे हा जनता दरबार मागचा खरा उद्देश आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहराचा विकास साधला जाईल. तुमच्या प्रत्येक समस्येवर तातडीने निर्णय घेतला जाईल आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आज या जनता दरबारात आपण उत्साहाने सहभागी झाला आहात, हेच या उपक्रमाचे यश आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करता तेव्हाच लोकशाहीचे खरे स्वरूप दिसते. आज येथे आलेल्या प्रत्येक नागरिकाने आपली अडचण मांडली आणि प्रशासनाने ती गांभीर्याने ऐकून घेतली आहे. जनता दरबार केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून, अमलबजावणीची सुरुवात आहे असेही MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि घुग्घूसवासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments