मनसेच्या वर्धापन दिनी सीएसटीपीएस(CSTPS) कंपनीत कामगार सेनेच्या शाखा फलकाचे उदघाटन
◾कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात शेकडो कामगार मनसेत
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील उद्धयोगात मोठ्या प्रमाणात कामगाराचे आर्थिक शोषण होतं असल्याने आशिया खंडात सर्वात मोठे असलेले चंद्रपूर महाऔष्णिक थर्मल पॉवर स्टेशनं येथे अनेक कंत्राटी कंपन्या कमागारांना किमान वेतन देत नसल्याने कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश करून कामगार सेनेच्या शाखा फलकाचे मनसेच्या 19 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उदघाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकड़े महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, महाराष्ट्र नवनिर्माण जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे, जिल्हाध्यक्ष सुनील गुड़े महाराष्ट्र नवनिर्माण विधि विभाग सेना जिल्हाध्यक्ष अँड अजित पांडे प्रणय सैदल, समीर खान, निहार मानकर,गणेश बोगावार व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
सीएसटीपीएस कंपनीत अनेक कामगार संघटना आहेत, परंतु कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून आता त्या कामगारांना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा एकमेव पर्याय दिसत असून कामगारं सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात कामगारांचे ज्वलंत प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल हा विश्वास कामगारांना झाला असल्याने सीएसटीपीएस कंपनीसमोर मनसे कामगार सेनेची शाखा कार्यकारणी फलकाचे उदघाटन मनसे वर्धापन दिनी करण्यात आले.
0 Comments