संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पूर्ववत अनुदान मिळावे यासाठी शिबिराचे आयोजन केले
◾लाभार्थ्यांना DBT पोर्टलमध्ये अनुदान वाटप करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्याचे निराकरण
◾लाभार्थ्यांना शासनाकडून माहे- डिसेंबर,2024 पासून DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांचे थेट बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वाटप
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून माहे- डिसेंबर,2024 पासून DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्यांचे थेट बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम वाटप करणे सुरु झाले आहे.
तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार मॅपिंग केले नसल्याने व आधार व्हेरिफिकेशन केले नसल्याने लाभार्थी अनुदान मिळण्यापासून वंचित झाले आहेत, लाभार्थ्यांना पूर्ववत अनुदान मिळावे यासाठी दि.26/3/2025 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरामध्ये तहसिलदार श्री.अभय गायकवाड व नायब तहसिलदार श्री.महेंद्र फुलझेले, श्री.अजय मल्लेलवार, यांनी लाभार्थ्यांना DBT पोर्टलमध्ये अनुदान वाटप करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्याचे निराकरण या समबंधाने लाभार्थ्यांना माहिती दिली. बँकेचे अधिकारी श्री.फुलझेले, श्री.नरांजे इतर बँक प्रतिनिधी यांनी लाभार्थ्यांना त्यांचे आधार बँक खात्यासोबत संलग्न करण्यास आवश्यक माहिती दिली.
दुरुस्ती करीता प्रस्तावित यादीमध्ये लाभार्थ्यांचे नाव आहे किंव्हा नाही याबद्दक प्राथमिक तपासणी मंडळ अधिकारी श्री.नवले व श्री.चौधरी तसेच ग्राम महसूल अधिकारी, सर्वश्री. कम्मलवार, पिल्लई, नौकरकर, चांदेकर, निंबाळकर, अकोजवार, झाडे, पुकळे व कु.आरती दुरत यांनी केली. प्राथमिक तपासणीनंतर संगायो शाखेच्या सहा.महसूल अधिकारी कु.सोनू गावंडे, संगणक ऑपरेटर बेबी दसरीया, सेतू केंद्र चालक/प्रतिनिधी श्री.यादव,श्री.मांढरे, श्री.रायपूरे,श्री.पेंदोर,श्री.सिन्हा श्री.झिलला,श्री.नाईक, व इतर सेतू केंद्र चालकांनी व बँकेच्या अधिकाऱ्यांनी शिबिरामध्ये आलेल्या जवळपास तिनशेचे वर उपस्थित लाभार्थ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे आधार मॅपिंग व व्हेरिफिकेशन केले आले.
शिबिरामध्ये बहुतांश लाभार्थी वयोवृद्ध असल्याने त्यांची बैठक व इतर व्यवस्थेचे नियोजन श्री.सतीश साळवे, नायब तहसीलदार व कार्यालयीन कर्मचारी श्री.वडूळे, कु.भगत, कु.गुज्जनवार, आदेश पेटकर, अमोल डोंगरे, पुंजाराम राऊत, संदीप वेटे, सुमित वाटगुरे यांनी केली. संगायो, श्रावणबाळ निराधार योजनेच्या जास्तीत-जास्त लाभार्त्यांची DBT पोर्टलमध्ये आधार दुरुस्ती व्हावी याकरीता मुख्याधिकारी, नगर परिषद,बल्लारपूर व संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, बल्लारपूर यांनी त्यांचे यंत्रणेमार्फत व्यापक प्रसिद्धी देऊन मोलाचे सहकार्य केले. संगायो समितीचे माजी अध्यक्ष श्री.समीर केने यांनी सुद्धा शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे DBT पोर्टलमध्ये दुरुस्ती होणेकरीता व्यापक प्रसिद्धी देऊन विशेष प्रयत्न केले. तालुक्यातील ज्या संगायो, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी अद्यापही DBT पोर्टलमध्ये आधार दुरुस्ती केली नाही याकरीता पुनश्च दि.8 एप्रिल, 2025 रोजी SDO ऑफिस, बल्लारपूर येथे शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी DBT पोर्टलमध्ये बँक खाते आधार मॅपिंग व आधार व्हेरिफिकेशन करुन घेण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments