Breaking news पिंक पैराडाइज बार अँण्ड रेस्टॉरेंट सिल
◾पोलीस ठाणे चंद्रपूर शहर ची कार्यवाही
चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : पोलीस ठाणे चंद्रपूर शहर हद्दीतील पिंक पैराडाईज बार अँण्ड रेस्टॉरेंट एफ. एल. 3 ही अनुज्ञप्ती ( परवाना कक्ष ) धारक यांनी आपले बार समोर बांधकाम साहित्य, रेती, गिट्टी, बल्ली, फाटे ठेवल्यामुळे बार मध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाहने ठेवण्यास पार्कंग व्यवस्था नसल्याने व वाहने रोड वर उभ्या असल्याने सार्वजनीक वाहतुकीस कोंडी निर्माण होऊन सर्वसाधारण नागरीकांना अडथळा व गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच सदर बार येथे झगडा भांडण होऊन त्याचे रूपांतर खुनासारख्या गंभीर गुन्हयात घडल्याने कायदा व सुव्यवथेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने परिसरातील नागरीकांच्या मागणीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 142 (2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार लोकहिताच्या दृष्टीने आज दि. 11/03 /2025 रोजी पिंक पैराडाइज बार अँण्ड रेस्टॉरेंट हे अनुज्ञप्ती धारक वैभव बनकर व पोलीस स्टॉफ च्या उपस्थितीत सिलबंद करण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात शहर पुलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व पोलीस स्टॉफ यांनी केली आहे.
0 Comments