सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख अर्थसंकल्प - आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक वर्गाला स्पर्श करणारा असून हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारने विविध क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदींचे स्वागत केले.
आमदार जोरगेवार म्हणाले, “या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, तरुण, महिला आणि उद्योग क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा, कृषी विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिले आहे, हे निश्चितच राज्याच्या प्रगतीस चालना देणारे आहे.”
विशेषत: कृषी क्षेत्रासाठी अनुदाने, जलसंधारण योजनेसाठी वाढवलेले बजेट आणि ग्रामीण भागातील विकासावर दिलेला भर याचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि नवीन स्टार्टअप्ससाठी दिलेली प्रोत्साहने यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून यामुळे महाराष्ट्र निश्चितच प्रगतिपथावर वाटचाल करेल असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
0 Comments