साहित्यिक, प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा - डॉ. अ. ना. रसनकुटे

 





साहित्यिक, प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा - डॉ. अ. ना. रसनकुटे



पुणे ( राज्य रिपोर्टर न्युज ) : गुरुवार, दि. 27 मार्च 2025 रोजी, पत्रकार भवन, पुणे येथे श्रीमंत पब्लिकेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून प्रकाशक वल्लभ गदादे (श्रीमंत सर ) यांनी  चार लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक, अध्यक्ष कोकण प्रदेश ( अ. भा. म. सा. प. )  डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या शुभहस्ते पार पडले. व्यासपिठावर  प्रकाशक वल्लभ गदादे, जीवन एक सापशिडीचा खेळ, पुस्तकाचे लेखक प्रा. प्रकाश कदम, समर्पण च्या लेखीका डॉ. अलका नाईक, BEYOND THE HORIZON चे लेखक समीर गुधाटे, अनसुनी कविताए च्या कांचन निकुंभ इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. असे कार्यक्रम वर्धापन दिनी भरवणे ही काही सहज साध्य होणारी बाब नाही. यासाठी कमालीचे कस्ट सोसावे लागतात. सगळीकडे जबाबदारीने बारीक लक्ष    ठेवावे लागते. असं असूनही प्रकाशकानी हॆ धाडस दाखवलं यातच सर्वकाही आलं. त्यांनी आपल्या भाषणात अध्यक्ष व इतर व्यासपीठावरील मान्यवारांची गोड शब्दांत प्रशंसा केली. डॉ. अलका नाईक या कविसंमेलनाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी आपल्या पुस्तकावर व अवयवदानावर विस्तारित भाष्य केलं.

      या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अ. ना. रसनकुटे यानी आपल्या अध्यक्षिय भाषणात, सर्वच प्रकाशक आपल्या प्रकाशन संस्थेचा वर्धापन दिन साजरा करतातच असं नाही. पण श्रीमंत पब्लिकेशनचे  प्रकाशक दर वर्षी आवर्जून वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साहित्यिक उपक्रम राबवून करतात. त्यामुळे नवोदित कवीना आपल्या कविता सादर कारण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळते. तसेच त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन होते. म्हणूनच जास्तीतजास्त साहित्यिक प्रकाशकांना जोडले जातात. 

आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे साहित्यिक आणि प्रकाशक यांची जबाबदारी वाढली आहे. याचं भान ठेऊन साहित्यिक, प्रकाशक आणि मराठी भाषिकांनी एकमेकांशी सुसंवाद साधला पाहिजे. मराठी साहित्याचा आणि परस्परांचा नेहमी आदर केला पाहिजे असं प्रतिपादन केलं. 

     जवळजवळ पन्नासहून अधिक कवी, कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. अलका नाईक यांनी आपल्या सुमधुर, ओघवत्या भाषेत सहजसुंदर केल्यामुळे कविसंमेलनाची रंगत अधिक वाढत गेली. त्यानंतर कविता सादर केलेल्या सर्व कवींना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रकाशकानी उपस्तितांचे आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Post a Comment

0 Comments