एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा,जिवंत बुलेट; तिन्ही आरोपीतांना अटक
◾बल्लारपुर पोलीसांनी अवैध्य अग्निशस्त्र व जिवंत काडतुस बाळगुण असणाऱ्या आरोपींतांच्या आवळल्या मुसक्या
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरात दिनांक २५/०३/२०२५ रोजी डि.बी. स्टॉफसह पेट्रोलींग करित असतांना पेट्रोलींग दरम्यान मुखबिरच्या खात्रीशीर खबरेवरुन साईबाबा वार्ड, बल्लारपुर येथे आरोपी नामे १) अभि वाल्मीक साव वय-२४ वर्षे, व्यवसाय-मजुरी रा. दत्तनगर नागपुर रोड चंद्रपुर जि. चंद्रपुर. २) विनीत नानाजी तावाडे वय-२४ वर्षे व्यवसाय-मजुरी रा. बापटनगर ओमभवन जवळ, चंद्रपुर जि. चंद्रपुर. ३) संकेत रविंद्र येसेकर वय-२४ वर्षे व्यवसाय-डायव्हर रा. राजनगर पठाणपुरा रोड चंद्रपुर जि. चंद्रपुर यांचे ताब्यातुन खालील वर्णनाचा मुदेदेमाल मिळून आला.
१) कि.अं.२०,०००/-रु. एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा ज्याची एकुण लांबी २४ सेमी बॅरलची लांबी ११ सेमी, बॅरलची गोलाई ५.५ सेमी, बॅरल पासुन लाकडी मुठेची लांबी १३ सेमी असलेली.
२) कि.अं.२०००/-रु. ०१ नग पितळी धातुचे जिवंत बुलेट ज्याची लांबी ७.५ सेमी बुलेट पितळी धातुचे असुन त्याची गोलाई ४ सेमी बुलेटच्या मागिल बाजुच्या पेंदयावर ८ एम.एम. के.एफ. असे लिहलेले. असा एकुण कि.अं.२२,०००/-रु. चा मुदेदेमाल मिळुन आल्याने पो.स्टे. ला. अप क्रं. २२४/२०२५ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ अन्वये गुन्हा नोंद करुन तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा.,श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.श्याम गव्हाणे, सपोनि. मदन दिवटे, परि.पो.उप.नि. सौरभ साळुखे, परि.पो.उप.नि. सुनिल धांडे, सफी. आंनद परचाके, पो.हवा. सुनिल कामटकर, पो.हवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, पो.हवा. संतोष पंडित, पोहवा. सत्यवार कोटनाके, पो.अं. वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, चापोअ. कैलास चिचवलकर, म.पो.अं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.
0 Comments