11 एप्रिल रोजी पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत पोटगी केसमध्ये जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
प्रतिभा विरुध्द मनोज मोरे या पोटगी केसमध्ये 1. हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटार सायकल 2. एक कुलर 3. एक एलजी कंपनीचा टिव्ही 4. दोन पिकोफॉल मशीन हिमालय कंपनीचे 5. विवो वाय 16 कंपनीचा मोबाईल हे सर्व साहित्य जप्त करून साहित्याची किंमत 28 हजार रुपये अधिकृत करण्यात आली आहे. 11 एप्रिल रोजी पो.स्टेशन पडोली येथे सकाळी 11 वाजता जाहीर लिलाव होणार आहे.
त्याकरीता उपरोक्त साहित्य खरेदी करणार निवेदाधारकांनी अनामत रक्कम 2800 रुपये भरणा करून आपले नाव लवकरात लवकर नोंदवावे, लिलावासंबंधी सर्व अधिकार ठाणेदार पो.स्टेशन पडोली यांना राहणार आहे.
0 Comments