WCL वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील मोबदला व नोकरीचा मार्ग मोकळा केल्याने गोवरी-पौनी परियोजनेतील प्रकल्पग्रस्तांनी मानले अहीरांचे आभार
◾गोवरी, चिंचोली, पौनी व साखरी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे वेकोली अधिग्रहण
◾राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ही अडचण दूर केले.
◾आर्थिक मोबदला थांबविल्याने नोकऱ्यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी-पौनी विस्तारीत खुल्या कोळसा खाण परियोजनेत मौजा गोवरी, चिंचोली, पौनी व साखरी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण होत असून वेकोलि प्रबंधनाने साध्या वाटणीपत्राच्या आधारे झालेले जमिनीचे फेरफार, शेतकऱ्यांचे करारनामे, आर्थिक मोबदला थांबविल्याने नोकऱ्यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणात हस्तक्षेप करून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ही अडचण दूर करीत हे प्रकरण मार्गी लावल्याने संबंधित प्रकल्पग्रस्तांनी त्यांची भेट घेवून आभार मानले.
वरील प्रश्नी गोवरी येथील शंकर बोढे, चिंचोलीचे महादेव हिंगाणे, प्रदीप आमने, गुरूदास अहीरकर, प्रमोद बोढे, शुभम अहीरकर, प्रशिल वनकर, वैभव काळे, प्रफुल उरकुडे, तुषार लोहे, आकाश नांदेकर, शुभम जुनघरी, शेखर पाचभाई, शुभम वासेकर, रूपेश पाचभाई, वैभव काडेकर व अन्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी भेट घेवून त्यांचेकडे आपली व्यथा मांडली होती. अहीर यांनी वेकोलि मुख्यालय नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, बल्लारपूर क्षेत्राचे महाप्रबंधक तसेच उपविभागीय अधिकारी राजुरा या स्तरावर बैठक, सुनावणी घेवून हा प्रश्न मार्गी लावल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या आर्थिक मोबदल्याचा तसेच नोकरीचा मार्ग मोकळा झाल्याने या सर्व शेतकऱ्यांनी नुकतेच निवासस्थानी जावून हंसराज अहीर यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
उल्लेखनिय बाब अशी की, पौनीवासिय ३६ शेतकऱ्यांची पौनी-१ आणि पौनी-२ प्रकल्पातून सुटलेली जमीन अधिग्रहीत करण्याकरिता सुध्दा अहीर यांनी विशेष प्रयत्न करून ही जमीन या प्रकल्पात अधिग्रहीत करवून घेण्यात यापूर्वी यश प्राप्त केले होते.
0 Comments