सनविजय कंपनीविरुद्ध मनसेच्या आंदोलनाला यश
◾कामगारांच्या मागण्या मान्य
◾आमदार जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने कामगारांची बाजू घेतली
◾पत्रकार परिषदेत कामगार सेना जिल्हाध्यक्ष अंधेवार यांची माहिती
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : ताडाळी एमआयडीसीमधील सनविजय कंपनी व्यवस्थापन स्थानिक मराठी कामगारांना त्रास देत आहे आणि एका कामगाराच्या अपघातानंतर त्याला वैद्यकीय उपचार देण्याऐवजी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. जेव्हा 10 कामगारांनी कंपनीविरुद्ध आवाज उठवला आणि त्यांना सुध्दा नोकरीवरून काढून टाकण्यात आले, तेव्हा मनसे कामगार सेनेने कंपनीच्या गेटसमोर ठिया आंदोलन केले. मनसेच्या आक्रमक आंदोलनानंतर आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार अधिका_यांनी केलेल्या चौकशीनंतर, कंपनीने आंदोलकांच्या तीन मागण्या मान्य केल्यानंतर आणि सर्व कामगार कामावर परतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंधेवार म्हणाले, मनसेच्या या आंदोलनामुळे अपघातात जखमी झालेले कार्यकर्ते स्वप्नील जोगी यांना वैद्यकीय खर्च आणि दोन महिन्यांचा पगार मिळणार आहे. गेल्या सात दिवसांपासून आंदोलन करणा_या कामगारांना त्या दिवसाचा पगार मिळेल आणि कामगार कायद्यानुसार कामगारांचे किमान वेतन आणि पीएफ कापले जाईल. आंदोलनातून शेकडो कामगारांना न्याय मिळाला आहे.
मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार अधिकारी फड आंदोलनाची दखल घेऊन कंपनीत गेले तेव्हा कंपनीत उपस्थित असलेले परप्रांतिय कामगार दहा ते बारा फूट भिंतीवरून उडी मारून पळून गेले, परंतु आंदोलक मराठी कामगारांनी त्यांना पकडले. त्या मजुरांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की ते झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील आहेत.
कामगार सेनेच्या पाठिंब्याने सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेत, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या आणि मंगळवारी आंदोलन यशस्वीरित्या संपले. कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबधे सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रीकर, अजित कुमार पांडे, मोहम्मद फयाज इत्यादींनी आंदोलनात भाग घेतला.
0 Comments