दिल्लीतील भाजपच्या एकहाती सत्तेचा चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल 27 वर्षांनी भाजपने स्पष्ट बहुमतात एकहाती सत्ता स्थापित केल्याबद्दल पुन्हा एकदा देशातील जनतेने मोदी हे तो मुमकिन है असे दाखवून दिले आहे. विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर दिल्लीकरानी विश्वास दाखविल्याने आज शनिवारी चंद्रपूर महानगरात भाजपच्या वतीने माजी पालकमंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात गिरणार चौक येथे जल्लोष करण्यात आला.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी ढोलताष्याच्या गजरात व फटाका्यांची अतिशबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपच्या महिला अध्यक्ष सविता कांबळे, रवी गुरूनले, पुरुषोत्तम सहारे,रवी लोणकर, विठ्ठल डुकरे, महेंद्र जुमडे, राजेंद्र खांडेकर, मधुकर राऊत, अरुण तिखे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष चांद पाशा सय्यद,वनिता डुकरे, कल्पना बागुलकर, माया उइके, जयश्री जुमडे, शितल गुरुनुले,आशा आबोजवार, वंदना तिखे,शीतल आत्राम, मनीषा महातव, सुनिता जयस्वाल, सारिका संदुरकर, संगीता बावणे, नूतन मेश्राम, अनिल अडूर, रणूताई घोडेस्वार, रंजिता येले, शितल शेलकर, अरविंद मळावी, वंदना डाखोरे, रबिया खान, नशिबा पठाण, हमिदा बाजी, नसरीन शेख, साधा शेख, आदींची उपस्थिती होती.
0 Comments