भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील निःशुल्क फिरते रूग्णालय गोरगरीबांसाठी वरदान
◾लोकार्पण प्रसंगी प्रसंगी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : ग्रामिण भागातील गोरगरीब, कष्टकरी व तळागाळात असलेल्या नागरिकांना निः शुल्क प्रभावी स्वास्थ्यविषयक अत्याधुनिक सोयी-सुविधा व तातडीची स्वास्थ्य सेवा प्राप्त व्हावी हे माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचे ध्येय आहे. हे ध्येय दृष्टीपथात ठेवून त्यांनी देशातील सार्वजनिक कंपन्या, उद्योगांना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून स्वास्थ्य सेवा उपलब्ध करण्यास बाध्य केले. निःशुल्क फिरते रूग्णालयांच्या सेवेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे. चंदनखेडा व परिसरात गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा निःशुल्क फिरते रूग्णालय हे याच धोरणाचे प्रतिक असून हे फिरते रूग्णालय भद्रावती तालुक्यातील गोरगरीब जनतेला वरदान ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
दि.०६ फेब्रुवारी रोजी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया (GAIL) द्वारा सामाजिक दायित्व निधी अंतर्गत नि:शुल्क फिरते रूग्णालयाच्या (अॅम्बुलन्स) लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास वरोराचे आमदार करण देवतळे, गेलचे कार्यकारी निदेशक अनुपकुमार गुप्ता, संचालक रविकांत कोल्हे, महाजन, डॉ. भगवान गायकवाड, अशोक हजारे, प्रशांत डाखरे, जिपचे माजी सदस्य मारोती गायकवाड, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, माजी पं.स.सभापती सौ. विद्याताई कांबळे, पं.स.च्या माजी सभापती इंदुताई नन्नावरे, उपसरपंच ग्रा.पं. चंदनखेडा सौ. भारतीताई उरकुडे, महेश टोंगे, विठ्ठल हनवते, डॉ. सागर वझे, सुरेश महाजन, बंडु नन्नावरे, संजय देवतळे, डेविड बागेसर, विठ्ठल कापकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात हंसराज अहीर यांनी हे फिरते रूग्णालय चंदनखेडा व भद्रावती तालुक्यातील अनेक गावातील विविध आजाराने तसेच दुर्धर व्याधीने ग्रस्त असलेल्या रूग्णांना उपकारक ठरेल असे सांगितले. या फिरत्या रूग्णालयाचा लाभ ग्रामिण भागातील सर्व स्तरातील रूग्णांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी राजुरा विधानसभा क्षेत्रात अशीच फिरते दोन अॅम्बुलन्स रूग्णालय सुरू झाले असून, या रूग्णालयाचा लाभ आजपर्यंत हजारो नागरिकांनी घेतला असून घरपोच रूग्णसेवा मिळत असल्याने या रूग्णालयास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. चंदनखेडा येथे लोकार्पण झालेल्या या रूग्णालयामुळे रूग्णांना मोठी सोय होणार असून रूग्णांच्या तकारीचे निरसन होईल त्यामुळे हे रूग्णालय नागरिकांच्या जिवीतासाठी मोलाचे ठरले असेही हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आमदार करण देवतळे व गेलचे कार्यकारी निदेशक अनुपकुमार गुप्ता यांनीही उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गजू रणदिवे, संतोष हनवते, बालाजी मगमवार, चंपत भरडे व इतरांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments