मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे टीबी या रोगाबद्दल मार्गदर्शन





मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व  कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे टीबी या रोगाबद्दल मार्गदर्शन

◾100 दिवसीय टी बी (क्षयरोग) मुक्त भारत अभियान अंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धा 

बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक 14 /2 /2025 ला मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व  कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे 100 दिवसीय टी बी (क्षयरोग) मुक्त भारत अभियान अंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धा तसेच टीबी या रोगाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्य मा.आसमा खान खलीदि मॅडम, मार्गदर्शक वक्ते स्वाती गोलपेलवार  मॅडम, विपीन झाडे सर, माधुरी भुरे मॅडम हे  आरोग्य विभाग टी.बी. (क्षयरोग)  या विभागातून उपस्थित होते.

आजचे विद्यार्थी उद्याचा भारत घडवणार आहे त्याकरिता विद्यार्थ्यांनी जंक फूड खाऊ नये, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता सकस व पोषक आहाराची आवश्यकता आहे . उपस्थित शिक्षकांना टी बी रोग्यांसाठी फूड बास्केट योजनेची माहिती दिली. टी.बी.या रोगाला कसा आळा घालता येईल व 100% टी.बी. मुक्त भारत कसा करता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अंती आरोग्य विभागाच्या वतीने  सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट पॉकेट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सीमा सोमनकर मॅडम यांनी केले .




Post a Comment

0 Comments