अत्याधुनिक निःशुल्क फिरते रूग्णालयाचे हंसराज अहीर यांचे शुभहस्ते आज चंदनखेडा येथे लोकार्पण

 



अत्याधुनिक निःशुल्क फिरते रूग्णालयाचे हंसराज अहीर यांचे शुभहस्ते आज चंदनखेडा येथे लोकार्पण


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकार व प्रयत्नामुळे चंद्रपूर जिल्‌ह्यातील चंदनखेडा (भद्रावती) परिसरातील गोरगरीब, कष्टकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर ऑनस्पॉट स्वास्थ्य सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त भावनेतून गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमी. (GAIL) द्वारा पुरस्कृत अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधांनी युक्त फिरत्या मोबाईल वैद्यकीय युनिट रूग्णालयाची सेवा सुरू केली असून या फिरत्या सुसज्ज रूग्णालयाचा (अॅम्बुलन्स) भव्य लोकार्पण सोहळा दि. ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी स. १०.०० वाजता हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे होत आहे.

या कार्यक्रमास वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, भाजप नेते खुशाल बोंडे, रमेश राजुरकर, गेलचे कार्यकारी निदेशक अनुप कुमार गुप्ता, माजी जि.प. सदस्य मारोती गायकवाड, माजी न.प. सदस्य प्रशांत डाखरे, पं.स.च्या माजी सभापती इंदुताई नन्नावरे, विद्याताई कामडे, पं.स.चे माजी उपसभापती प्रविण ठेंगणे, चंदनखेडा सरपंच नयन जांभुळे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याप्रती जागरूक लोकप्रतिनिधी या नात्याने हंसराज अहीर यांनी सिकलसेल, हृदयरोग, महिलांमधील रक्ताल्पता व अन्य आजाराविषयी शिबीराचे आयोजन करीत जिल्ह्यातील रूग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सदैव प्रयत्न केला आहे. फिरत्या मोबाईल मेडिकल युनिट अॅम्बुलन्स रूग्णालयाची सेवा ही सुध्दा त्यांच्या रूग्णाप्रती असलेल्या कर्तव्याची एक पावतीच आहे. या मोबाईल मेडिकल युनिट अॅम्बुलन्सच्या सेवेमुळे ग्रामीण भागातील दुर्धर आजाराने ग्रस्त व अन्य आजारी रुग्णांची मोठी सोय होईल असा आशावाद राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.




Post a Comment

0 Comments