बल्लारपूरात संभाजी ब्रिगेड तर्फे शिवजन्मोत्सव थाटात साजरा

 




बल्लारपूरात संभाजी ब्रिगेड तर्फे शिवजन्मोत्सव थाटात साजरा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव संभाजी ब्रिगेड तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून हा सोहळा साजरा केला जात असून यंदाही १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळी ९ वाजता मराठा सेवा संघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी जूनी नगर पालिका स्थित शिवस्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरुवात शिवमती सुवर्णा ताई कष्टी आणि शिवमती आचल काकडे यांच्या सामूहिक जिजाऊ वंदनेने करण्यात आली. त्यानंतर मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर माडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सुंदर गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते रोहित चुटे यांनी केले, तर राजेश खेडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे साहिल घिवे, संकेत चौधरी, प्रतीक वाटेकर, निखिल वडस्कर , गणेश मसराम ,प्रज्वल गौरकर,अंकुश पिंपळकर,अनिकेत गजभिये, पवन राजगडे , अक्षय गारघाटे, मयुर पोडे,अर्जुन मुरकुटे,हितेश भीमांवर, रूपेश विरुकटकर,गोलू गौकर, अमोल  आडे, आमिर अहमद ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज समिती, बल्लारपूर यांच्या वतीने शिवभोजन आयोजित करण्यात आले होते, ज्याचा असंख्य लोकांनी आनंद घेत यावेळी उपस्थित  उत्सवाच्या दरम्यान, उपस्थित शिवभक्तांनी "छत्रपती शिवाजी महाराज की जय!"  च्या जयघोषासोबत "सिंह गेला सिंहासन गेला... पण पुन्हा सिंहासन निर्माण करणारा शिवबा आला!"  ही घोषणाबाजी करत ‘छावा’ चित्रपटातील संवाद साकार करत उत्साह द्विगुणित केला.




Post a Comment

0 Comments