रेती माफियांचा व्यापारी वर प्राणघातक हल्ला

 


रेती माफियांचा व्यापारी वर प्राणघातक हल्ला

◾पत्रपरिषदेत आरोपी वर सक्त कार्रवाई करण्याची सोनी बंधु ची मागणी

◾रेती माफिया यांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करीत संबंधितांवर कडक कार्रवाई करण्याची मागणी सोनी बंधु ने केली

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : विरूर स्टेशन येथील व्यापारी संघटनेच्या सारडा काम्प्लेक्स गोदाम येथे व्यापारी संघटनेची बैठक चालु असतांना विरूर स्टेशन निवासी रामावतार सोनी व ललितकुमार सोनी यांचेवर रेती माफिया यांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करीत संबंधितांवर कडक कार्रवाई करण्याची मागणी सोनी बंधु ने केली आहे. 

पत्रपरिषदेत सोनी बंधु ने सांगितले की, दोघेही बंधु हे आठवडी बाजारात स्वत:चे धान्याचे दुकान चालवितात. 2 फेब्रुवारी चे रात्री 8 वाजता सारडा काम्प्लेक्स येथे व्यापारी संघटनेची बैठक असल्याने मोठे भाऊ रामावतार सोनी व गोपाल जकोटीया, जगतसिंग वधावन व अन्य व्यापारी बैठकीला उपस्थित होते. याचवेळी सतीश कोमरवेल्लीवार, प्रकाश कोरमरवेल्लीवार, रूपेश कोमरवेल्लीवार, सचिन कोमरवेल्लीवार, दिनेश कोमरवेल्लीवार हे जवळ येऊन मोठे भाऊ रामावतार सोनी व ललितकुमार सोनी यांना रेती तस्कारांना त्रास देता, पुलिस कंट्रोल रूम वर फोन करून रेती तस्करी ची माहिती देता, व्हाटस वर माहिती प्रसारित करता, जिल्हाधिकारी, खनिज विभाग, तहसीलदार यांचेकडे पत्रव्यवहार करून कार्रवाई ची मागणी करता असे बोलुन सतीश कोमरवेल्लीवार व उक्त अन्य आरोपींनी विवाद उत्पन्न करत मारपीट केल्याची माहीती सोनी बंधुनी पत्रपरीषदेत दीली. मारपीट मध्ये दोघेही बंधुना इजा झाली. 

यावेळी उपस्थित पुलिस हवालदार विजय मुंडे यांनी मध्यस्थता करून आरोपींना समजविण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. विरूर स्टेशन पुलिस येथे तक्रार केली आहे. सोनी बंधुने पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत व विजन ब्लोअर कायद्या अंतर्गत उक्त आरोपींवर कार्यवाही करून न्याय व संरक्षण करण्याची मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातुन केली आहे.  




Post a Comment

0 Comments