चंद्रपूर-बल्लारपूर वेकोलि महाप्रबंधकांसोबत स्थानिकांच्या रोजगाराविषयी हंसराज अहीर यांची चर्चा
◾राज्यशासनाच्या धोरणानुसार स्थानिकांना ओबी कंपन्यांमध्ये प्राधान्य व एच.पी.सी. नुसार वेतन देण्याचे निर्देश
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : स्थानिक सुशिक्षित व व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या प्रकल्प प्रभावित व परिसरातील बेरोजगार युवकांना वेकोलि कार्यक्षेत्रात ओबी उत्खनन प्रयोजनार्थ कार्यरत कपन्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ८०:२० या धोरणानुसार रोजगार उपलब्ध करण्याकरिता व वेकोलि प्रकल्पग्रस्त तसेच अन्य प्रलंबित प्रश्नांच्या निवारणा संदर्भात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर व बल्लारपूर वेकोलि क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक व अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेवून नुकतीच अनेक विषयावर चर्चा केली.
सदर बैठकीमध्ये हंसराज अहीर यांनी वेकोलिच्या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या ओबी उत्खनन कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासंदर्भात भेदभाव व अन्याय केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने या कंपनीमध्ये अधिकाधिक स्थानिक बेरोजगार युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेण्याचे धोरण स्विकारून ठेकेदारी तत्वांवर रोजगार देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या ८०:२० धोरणाचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश क्षेत्रीय महाप्रबंधक व संबधित अधिकाऱ्यांना दिले.
ओबी उत्खनन कंपनीचे व्यवस्थापन शासनाच्या निर्णयाची अवहेलना करीत असल्याबाबत खेद व्यक्त करीत वेकोलि प्रबंधनाने स्थानिकांच्या रोजगाराविषयी कंपनीला बाध्य करतांनाच या बेरोजगारांना तातडीने रोजगार उपलब्ध करण्याची सुचना केली.
वेकोलि क्षेत्रीय कार्यक्षेत्रात नव्याने येणाऱ्या अशा सर्व कंपनीमध्ये कार्य करण्यासाठी ऑपरेटर, ड्रायव्हर, सुपरवायझर, हेल्पर या सर्व पदाची भरती स्थानिकांना शासननिर्णयाच्या धर्तीवरच विशेष प्राधान्य देत तसेच एच.पी.सी. नुसार वेतन देण्याचे आणि वेकोलि द्वारा सी.एस.आर. अंतर्गत वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश सुध्दा हंसराज अहीर यांनी या बैठकीत दिले. सोबतच बल्लारपूर क्षेत्रातील प्रस्तावित जमिन अधिग्रहण प्रकल्प व त्यातील अन्य समस्यांबाबत सुध्दा अहीर यांनी यावेळी चर्चा केली.
0 Comments