नागपूर येथे 23 आणि 24 मार्च ला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तीसरे अधिवेशन
◾पत्रकार परिषदेत विराआंस चे अध्यक्ष एड. चटप यांची माहीती
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : चळवळीत लोकसहभाग वाढवणे आणि बलवान वैचारिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे या उद्देशाने विदर्भ राज्य आंदोलन समिती ने 23 आणि 24 मार्च 2025 ला नागपूर येथे तिसरे अधिवेशन आयोजित केले असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एड. चटप म्हणाले की, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, कुपोषण आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू दर, गंभीर माता मृत्यू दर आणि नक्षलवाद या गंभीर समस्यांवर सखोल अभ्यास आणि सादरीकरण करण्यासाठी आणि विदर्भातील समाज मन जागृत करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
एड. चटप म्हणाले, विदर्भात नागपुर करारानुसार 1960 पासुन 23 टक्के प्रमाण सिंचनाचा असलेला 60 हजार कोटीचा अनुशेष, त्यामुळे अपूर्ण असलेले 131 सिंचनप्रदुषण त्यामुळे सिचंनाखाली न आलेली 14 लाख हे.आर. जमीन तसेच रस्ते, पिण्याचे पाणी, उद्योग, उर्जा, सार्वजनिक, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, आदिवासी विकास, समाज कल्याण यांचा असलेला 15 हजार कोटीचा अनुशेष व राज्य 7 लाख 14 हजार कोटीच्या कर्जाखाली दबले असुन राज्य आर्थिकदृष्ट्या दिवाळ खोरीच्या उंबरठ्यावर आहे.
विदर्भाचे राज्य हे सक्षम व शिलकीचे दर्शविणारा अर्थसंकल्प डॉ. श्रीनिवास खांदेवाले अधिवेशनात मांडणार आहे. विदर्भातील माणसाला देशातील इतर नागरीकाप्रमाणे माणुस म्हणुन सन्मानाने व सुखाने जगण्याचा अधिकार प्रदान करावा यासाठीचा लढा अधिवेशनानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवुन तीव्र केला जाणार आहे अशी माहीती दीली.
पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांच्यासह पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, कपिल इद्दे, सुदाम राठोड, मितीन भागवत, किशोर दहेकर, अंकुश वाघमारे, शालिक मावलीकर, मुन्ना खोब्रागडे, मुन्ना आवाडे, मारोतराव बोथले, मुकेश जीवतोडे, प्रशांत नखाते, गोविंद मित्रा उपस्थित होते.
0 Comments