बल्लारपूर तालुका प्रशासनाचे भरारी पथकाची 12 वी परीक्षा केंद्रावर अचानक भेट देऊन तपासणी ...!





बल्लारपूर तालुका प्रशासनाचे भरारी पथकाची 12 वी परीक्षा केंद्रावर अचानक भेट देऊन तपासणी ...!

◾परीक्षा केंद्रावर  कोणताही अनुचित प्रकार दिसून आला नाही.


बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर तालुक्यातील वर्ग 12 वी चे परीक्षा वेळेस परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली भरारी पथकाकडून बल्लारपूर येथील गुरुनानक कनिष्ठ महाविद्यालय, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, थापर कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रास आज दि.13/2/2025 रोजी अचानक भेट देण्यात आली असता परीक्षा केंद्रावर  कोणताही अनुचित प्रकार दिसून आला नाही. शासन निर्देशाप्रमाणे परिक्षा केंद्रावरील कर्मचारी त्यांचे कर्तव्य योग्यरित्या बजावीत असल्याचे दिसून आले. भरारी पथकामध्ये श्री.अभय गायकवाड तहसिलदार,बल्लारपूर, तसेच नायब तहसिलदार श्री. महेंद्र फुलझेले व अजय मल्लेलवार सहभागी होते.




Post a Comment

0 Comments