७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा निमित्त भीमसैनिक संघटना स्थापित.
◾मुंबईतील सायन कोळीवाडा स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ह्या ठिकाणी
मुंबई ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा निमित्त संपुर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत नेहमी जागृत राहणाऱ्या युवा वर्गांचा मिशन आंबेडकर अंतर्गत "भीमसैनिक" ह्या संघटनेचा प्रारंभ करण्यात आला.
तद्प्रसंगी मुंबईतील सामाजिक उपक्रम राबवणारे अनेक व्दिगज संघटना पदाधिकारीसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोहळ्यास उपस्थित राहून सहभागी झाले.
भीमसैनिक संघटना तळागाळातील युवा वर्गासाठी बौध्दीक विकास, शैक्षणिक, व्यावसायिक रोजगार, वैद्यकीय सेवा, संविधानिक अधिकार आणि विविध माध्यमातून प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर भीमसैनिकास मनोबळ, पाठबळ आणि आर्थिक बळ देऊन नवयुगाची नांदी सुरु केलेली आहे.
यावेळी अनेक बांधवांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमाणसात रुजविण्यासाठी भीमसैनिकांचा उद्देश सर्वांसमोर मांडला. उस्फुर्त प्रतिसाद देत भीमसैनिक संघटनेचे स्वागत झाले. तसेच, अनुशासन व शिष्टाचार आकलनासाठी कवायतीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीराकरीता नाव नोंदणी अभियानही राबविण्यात आले. शालेय विद्यार्थीनींनी समुह गीत व राष्ट्रीय गीत गाऊन मंत्रमुग्ध केले तर देशपर गीतांवर आधारित नृत्य आविष्काराने सर्वांची मन जिंकली. शेवटी समाज बांधवांच्या एका हाकेला साद देऊन एकजुटीने भीमसैनिक तत्पर राहील, अशी शपथ घेऊन कार्यक्रमाचा सांगता बहुसंख्येने उपस्थित भीमसैनिकांनी मोठ्या जल्लोषात संपन्न केला.
0 Comments