ठोक भाजीपाला विक्रेतांच्या विविध मागण्यासाठी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा
◾आठवडी बाजाराकरिता पाच एकर जागा मंजूर करून द्यावं
◾ठोक भाजीपाला विक्रेते ,फळ विक्रेते व आठवडी बाजारातील विविध मागण्या पूर्ण करवून द्यावं
◾मागण्याबाबत श्री महात्मा ज्योतिबा फुले ठोक सब्जी विक्रेता सहभागी
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर शहरातील ठोक भाजीपाला विक्रेते ,फळ विक्रेते व आठवडी बाजारातील विविध मागण्याबाबत श्री महात्मा ज्योतिबा फुले ठोक सब्जी विक्रेता मंडळातर्फे दिनांक 20/01/2025 ला जनहिता करिता सदैव संघर्ष करणारे नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष भारत भाऊ थूलकर यांचे नेतृत्वात नगर परिषद बल्लारपुर कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला प्रथमत-सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास माल्या अर्पण करून धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी समितीचे अध्यक्ष व धरणा आंदोलन कार्यक्रमाचे अध्यक्ष नासीरभक्ष उर्फ भुरू भाई, समितीचे सचिव दीपक भगत, मोहम्मद शरीफ सर, नागेश गान्डलेवार, रवी पुप्पलवार, भारत थूलकर इत्यादींनी आठवडी बाजारातील समस्याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर आलापल्ली चंद्रपूर मार्गाने मोर्चा जुना बस स्टँड मार्गे नगर परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला याप्रसंगी बल्लारपूर येथील सर्व ठोक भाजीपाला विक्री दुकानदार, फल दुकानदार व चिल्लर दुकानदारांनी बाजार बंद ठेवला.
मोर्चात स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला व आठवडी बाजाराकरिता पाच एकर जागा मंजूर झाली पाहिजे. दुकान गाठे धारकांना आकारण्यात येणारे मासिक किराया कमी करून किरायात समाविष्ट केलेला जीएसटी कर रद्द करण्यात यावा.
बाजारात येणाऱ्या व्यापारांचे वाहन व नागरिकांचे वाहन पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे,इत्यादी घोषणा मोर्चेकर्यांनी शहर दणाणून सोडले मोर्चाचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी स्वीकारले व सादर केलेल्या मागण्यावर लवकरच उपायोजना करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मोर्चा यशस्वी करण्याकरिता समितीचे अध्यक्ष नसिर बक्ष, समितीचे सचिव दीपक भगत, निशांत वनकर,प्रवीण धोडरे,रोशन गायवान,गैभिदास पाझारे, प्रेमदास मून, सुशील कांबळे, प्रशांत वनकर, मुकेश झाडे, फैजू भाई, स्वानंद डेंगळे,बशीर भाई, जावेद भाई, इत्यादींनी परिश्रम घेतले.
0 Comments