सुशिक्षित अभियंत्यांच्या कामाच्या वाटपात पारदर्शकता आणा
◾काम वाटपात व्यत्यय आणणाऱ्यांना काळया यादीत टाका
◾राज्य अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष लबाडिया ची पत्रपरिषदेत मागणी
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 24 कामांच्या वाटपासाठी आयोजित बैठकीत व्यत्यय आनुन मारहाण, धमकाविऱ्या सुदीप रोडे, रमीज शेख व सूरज गौकार ला काळ्या यादीत टाकून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे तसेच जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची निवडणूक घेण्यात यावे, काम वाटपात पारदर्शकता आणण्याची मागणी राज्य अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश लबाडिया यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
लबाडिया यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वाटप करण्यासाठी 3 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सुमारे 250 सुशिक्षित बेरोजगार अभियंते सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याने सभेपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात करायची होती. मात्र यावेळी सुदीप रोडे व त्यांचे सहकारी रमीज शेख, सूरज गौकार आदींनी तेथे विरोध करत त्यांच्या फोटोला पुष्पहार घालण्याची गरज नसल्याचे सांगत वादावादी सुरू केली. तेथे उपस्थित सुशिक्षित बेरोजगारांनी शांतपणे बसून सभा सुरू केली. एवढेच नाही तर सभेदरम्यान रोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी टोमणे मारणे व अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभा शांततेत पार पाडण्याचे प्रयत्न सुरू होते.
बैठकीनंतर सर्व अभियंते खाली काही कामावर चर्चा करत होते. त्यानंतर सुदीप रोडे व रमीज शेख यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने रोडे व त्याच्या साथीदारांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना बोलावून लबाडिया व त्याच्या साथीदारांवर लोखंडी हत्यारांनी हल्ला केल्याची माहिती दिली. मारहाणीत लबाडियांच्या डोक्यावर खोल जखम झाली. इतर सुशिक्षित बेरोजगारांना सुध्दा मारहाण करण्यात आली.
या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील सहा आमदारांना, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून काम वाटपाच्या बैठकीत बाहेरून मुले आणण्याची गरज आहे का याची तपासणी करून सुदीप रोडे, रमीज शेख आणि सूरज गौकार यांची चौकशी करावी, जिल्ह्यातील बेरोजगार अभियंत्यांना काम वाटप समितीत एकच प्रतिनिधी असल्याने काम वाटपात पारदर्शकता आणने आणि सुदीप रोडे, रमीज शेख व सूरज गौकार यांना काळ्या यादीत टाकून परवाना रद्द करण्याची मागणी पत्र परिषदेत राज्य अभियंता संघटने चे जिलाध्यक्ष जगदिश लबाडिया यांनी केली आहे.
0 Comments