नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा चिरला गळा
चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे : नायलोन मांजा हा पक्षी व मानवासाठी हानीकारक आहे. यामुळे जीवही जाऊ शकतो, त्यामुळे शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे.
त्याच्या अमलबजावणीसाठी प्रशासन अलर्ट झाले आहे. परंतु, यानंतरही छुप्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. नेरी येथे दुचाकीने जात असताना रस्त्यावर आलेल्या पतंगाच्या मांजाने एका इसमाचा गळा चिरडला, मात्र सदर प्रकार लक्षात येताच तत्काळ हाताने मांजा पकडल्याने थोडक्यात इसम बचावला ही घटना नेरी येथील कन्या शाळेजवळ घडली.
नेरी येथील व्यावसायिक रोशन लांजेकर काही कामानिमित्त कन्या शाळेजवळून दुचाकीने जात असताना अचानक पतंगचा मांजा समोर आल्याने गळा चिरला गेला. यावेळी दुचाकीची गती संथअसल्याने त्यांनी तत्काळ मांजा हातात पकडला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. परंतु, नायलॉन मांजाने गळा आणि हात चिरल्याने गंभीर दुखापत झाली आहे. नेरी येथील खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचार चिमूर येथील रुग्णालयात सुरू आहे. सदर प्रकरणी अज्ञात पतंग उडवणाऱ्या वर कारवाई करावी व नेरी परिसरात मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी मोहिम राबविण्यात यावी अशी मागणी नेरीवासीयांकडून केली जात आहे.
0 Comments