विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याचे शिक्षण परिषदेत लोकाधिकारप्रमुख
◾हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांचे सर्व शिक्षकांना आव्हान.
लातूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हरंगुळ ( बु.) येथे माहे डिसेंबर - २०२४ ची शिक्षण परिषद केंद्रीय शाळा हरंगुळ (बु.) येथे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेस हरंगुळ (बु.) चे माजी सरपंच तथा लोकाधिकार न्यूज चे संपादक व्यंकटराव पनाळे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना व्यंकटराव पनाळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय अन्य साहित्य वाचण्याविषयीची गोडी निर्माण करून वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तसेच केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी लागणारी पुस्तके व ग्रंथसंपदा उपलब्ध करून देऊ असेही सांगितले.
या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून हरंगुळ केंद्राचे केंद्रप्रमुख गोरखनाथ लोखंडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा हरंगुळाचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे साहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या शिक्षण परिषदेत उपस्थित शिक्षकांना श्री. माधव पवार यांनी विषय बुद्धिमत्ता इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व श्री. प्रकाश जाधव यांनी मौखिक भाषा विकास, श्रीमती. चव्हाण माधुरी यांनी बेरीज वजाबाकी याविषयी तर श्री. लोखंडे जी एम यांनी रंगोत्सव स्पर्धा या विषयाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट असे सूत्रसंचालन श्रीमती. भुजबळ मॅडम यांनी केले, आणि शेवटी उपस्थितांचे केंद्रीय मुख्याध्यापक करकीले सर यांनी आभार मानले व त्यानंतर शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली. सदरील शिक्षण परिषदेस केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
0 Comments