महात्मा ज्योतीबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय,बल्लारपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 26 जानेवारी 2025 रोज रविवार ला महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय बल्लारपूर येथील प्रांगणात ध्वजारोहण समारंभ शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान मकसुद अहमद यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव श्रीमान सुभाष ताजने , शाळेतील पर्यवेक्षक श्रीमान प्रकाश , श्रीमान डी.लक्ष्मणराव (से. नि. पर्यवेक्षक) सर्व माध्यमातील पाळी प्रमुख , शिक्षकेतर कर्मचारी हिंदी, उर्दू, तेलुगू तिन्ही माध्यमातील विद्यार्थी विद्यार्थिनी तथा पालक वर्ग उपस्थित होते.
झाकीर हुसेन वॉर्ड तथा मौलाना आझाद वॉर्ड मधील प्रमुख रस्त्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी , शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यानंतर शाळेच्या प्रांगणात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत स्पर्धा,डान्स , लघुनाटिका इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांचा विकास व्हावा या करिता चित्रकला व हस्तकला प्रदर्शनी चे शाळेतील प्रांगणात आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम , द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमान रवि अन्सुरी यांनी केले. संचालन श्रीमान रूपेश बोरकुटे यांनी केले. श्रीमती रजनी केशकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. प्रजासत्ताक दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments