महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रा.महेश पानसे यांची नियुक्ती

 






महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रा.महेश पानसे यांची नियुक्ती

मुंबई ( राज्य रिपोर्टर न्युज  ) :  राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रा.महेश पानसे यांची नियुक्ती संघाचे संस्थापक संघटक संजयजी भोकरे यांचे शिफारशीनुसार राज्य कार्यकारिणी ने केली आहे. नुकत्याच झालेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचे सभेत ही घोषणा करण्यात आली आहे.

         गत ७ वर्षापासून प्रा.महेश पानसे हे राज्य पत्रकार संघात कार्यरत असून त्यांनी याआधी संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, विदर्भ विभागीय अध्यक्ष पद यशस्वी पणे सांभाळले आहे. त्यांच्या नेतुत्वात चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया,नागपूर, वर्धा जिल्ह्यात संघटना मोठ्या प्रमाणात विस्तारली असून पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मोठा प्रयत्न झाला आहे. मोठ्या प्रमाणात पत्रकारांची एकजुट त्यांच्या पुढाकाराने झाली आहे. महेश पानसे हे गत २५ वर्षांपासून पत्रकारीता करीत असून निर्भीड पत्रकार व पत्रकारीतेतील चाणक्य म्हणून ते ओळखले जातात.

               राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राज्य अध्यक्ष गोविंदराव वाकडे, राज्य कार्याध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य  सदस्य बाळासाहेब देशमुख, विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भागॅव, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप शेंडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष सदाशिव ढेंगे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रुपराज वाकोडे, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष शंकर बोरघरे, यांचेसह संघटनेचे अनेक पदाधिकारी, तालुकाध्यक्ष,सभासद, पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे.




Post a Comment

0 Comments