लोकशाही रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदार दिनी कांग्रेस पार्टीच्या आंदोलन






लोकशाही रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदार दिनी कांग्रेस पक्षांचे आंदोलन 

◾चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस तर्फे निवडणुक आयोगाच्या कारभाराच्या विरोधातील आंदोलन 

◾विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कार्यप्रणाली आणि EVM विरोधात काँग्रेसची स्पष्ट भूमिका 

◾जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांना निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कार्यप्रणाली बद्दल  काँगेसच्या वतीने निवेदन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेने तसेच चंद्रपूर शहर काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आलेले निवडणुक आयोगाच्या कारभाराच्या विरोधातील आंदोलन चंद्रपूर येथील गांधी चौक येथे संपन्न झाले.

 महाराष्ट्रातील झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कार्यप्रणाली आणि EVM विरोधात काँग्रेसची स्पष्ट भूमिका यावेळी मांडली. तसेच निवडणूक काळातील वाढलेली मतदान आकडेवरीमुळे नागरिकांत निर्माण झालेल्या संभ्रमाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले. 

यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांना निवडणूक आयोगाच्या संशयास्पद कार्यप्रणाली बद्दल चंद्रपूर काँगेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर, माझी आमदार सुभाष भाऊ धोटे, रामू तिवारी, विनोद दत्तात्रये, सुनंदा धोबे, चंदा ताई वैरागळे तसेच यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments