राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह

 




राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह

◾मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा 


 बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक 17.1.2025 ला मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत  कागदाची प्लेट व वाट्या तयार करणाऱ्या लघु उद्योगास भेट दिली. 

हा एक घरगुती लघुउद्योग असून मशीनद्वारे कागदी प्लेटा व वाट्या कशा तयार करतात याबाबतचे  विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून व्यवसायाविषयी आवड निर्माण करण्यात आले. 

दिनांक 18.1.2025 ला एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी श्री. सुनील दालवणकर सर ( मायक्रोसोफ्ट कम्प्युटर एज्युकेशन ) व मार्गदर्शक तज्ञ म्हणून  सौ. सुषमा दालवणकर आणि अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका असमा खान खलीदी  मॅडम आणि पर्यवेक्षिका सौ.विमल रच्चावार मॅडम मंचावर उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यवसायाची कास धरावी तसेच शिक्षणाबरोबर व्यवसाय मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना कशी आवश्यकता आहे याबाबतचे मार्गदर्शन सौ. सुषमा दालवणकर मॅडम यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन सौ भावना दुबे मॅडम यांनी केले व आभार श्री. साळवे सर यांनी  मानले . या कार्यक्रमात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments