सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती संबंध आमरण उपोषण; मंडपाला भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गात्ते यांची भेट
◾22 जानेवारीला मुंबई मंत्रालयात सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती संबंधाने सहकार मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रियेतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे मनोज पोतराजे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून या आंदोलनाची दखल घेत भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गात्ते चंद्रपुरात दाखल होऊन त्यांनी आमरण उपोषण करणाऱ्या पोतराज यांची भेट घेतली, दरम्यान सिडीसीसी बैंक नोकर भरती मागासवर्गीय एससी,एसटी व ओबीसी घटकातील उमेदवारांना आरक्षण दिलं नसल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे शासन प्रशासनाकडे जो पाठपुरावा केला व ही नोकर भरती रद्द करण्याची मागणी केली ती न्यायोचित असून आम्ही सर्व भाजप ओबीसी सेल चे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा आहे असे त्यांनी जाहीर केले.
यावेळी त्यांनी सहकार राज्यमंत्री डॉ, पंकज भोयर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली व या प्रकरणी बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. येत्या 22 जानेवारीला मुंबई मंत्रालयात सिडीसीसी बैंकेच्या भ्रष्ट नोकर भरती संबंधाने सहकार मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नोकर भरतीवर स्थगिती आणू असे आश्वासन त्यांनी दिले, यावेळी भाजप ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवातोडे, प्रदेश सदस्य विनोद शेरकी यांच्यासह आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे आमरण उपोषण करणारे मनोज पोतराजे, समन्वयक राजू कुकडे, संजय कन्नावार, आंबीद अली, अनुप यादव, राजू बिट्टूलवार, आनंद इंगळे, महेश वासलवार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, सुरेश श्रीवास्तर, मिलिंद खोब्रागडे इत्यादीची उपस्थिती होती.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरतीत मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा समावेश केला गेला नसल्याने आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात दाखल न्यायालयीन याचिकेवर सुनावणी होईपर्यंत नियुक्तिपत्र देऊ नये, ही नोकरभरती तात्काळ रद्द करावी, आर्थिक गैरव्यवहार आणि ऑनलाईन परीक्षेतील घोळाची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागण्यांसाठी आरक्षण बचाव कृती समितीचे सदस्य मनोज पोतराजे यांनी गुरुवारपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अनेक सामाजिक शैक्षणिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जोगी, मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार, नितीन बनसोड, आनंद इंगळे, अनिल बडवाईक, ब्रिजभूषण पाझारे, उमेश बोडेकर, अनिल भोंगळे, यांनी भेट दिली, आरक्षण बचाव कृती समितीच्या या आंदोलनाला नागरिक आणि संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणी समाजातील विविध स्तरांमधून करण्यात येत आहे.
0 Comments