भिसी येथे एका नराधमाने केला आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

 




भिसी येथे एका नराधमाने केला आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

◾नराधमास फाशीची शिक्षा दयावी अशी नागरिकांची मागणी

◾अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग - पोलीसांनी आरोपीस केली अटक


चिमूर ( राज्य रिपोर्टर न्युज ), शार्दुल पचारे : दिनांक. १२ जानेवारी रविवार ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास भिसी येथील एका नराधमाने खाऊचे आमिष दाखवित एका पडक्या घरात नेऊन  अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केल्याची घटना भिसी येथे घडली. प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अरविंद हरीदास नगराळे रा.भिसी वय ४० वर्षे यांने दुपारी २:३० ते ३:३०  वाजताच्या सुमारास बाजार चौकातील लव धांडे यांच्या पडक्या घरात अल्पवयीन पिडीत मुलीला खाऊ देतो म्हणुन नेले व लैंगिक अत्याचार केला. 

हि घटना गावातील नागरीकांना माहित होताच नागरिकांनी पोलीस स्टेशनवर जमाव केला असता जमावाला पोलीस प्रशासनाने शांत केले. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे नेते डॉ. दिलीप शिवरकर , स्वप्नील गाडीवार , रविन्द्र लोहकरे , निलेश गभणे  कॉग्रेसचे नेते अरविंद रेवतकर , सचीन गाडीवार यांनी प्रकरणाची दखल घेत ठाणेदार यांची भेट घेतली असून आरोपीस कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध अप क्रमांक 04/25 कलम 64, 64 (2 ) (I ) ,64 ( 2 ) (J ) ,65 (2 ) , बि.एन.एस. सह कलम 4,8 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पाटील करीत आहेत.




Post a Comment

0 Comments