मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, बल्लारपूर येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे दोन दिवशीय आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाला खालील मान्यवर लाभले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. धनंजय साळवे साहेब,गटविकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. जैनुद्दीन जव्हेरी साहेब माजी आमदार विधान परिषद,महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर, शाळेच्या प्राचार्या माननीय असमा खान खलीदी मॅडम,माननीय रविंद्र लामगे साहेब गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर,नागेंद्र कुंबरे केंद्रप्रमुख केंद्र विसापूर, सबतकौर भोंड मॅडम केंद्रप्रमुख केंद्र बामणी व कोठारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण प तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती जगझाप मॅडम व मीना शेंडे मॅडम तसेच प्रास्ताविक रवींद्र लामगे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांनी केली. याचबरोबर धनंजय साळवे साहेब यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी माहिती सांगितली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जैनुद्दीन जव्हेरी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषे चे महत्व पटवून दिले. शाळेच्या प्राचार्या अस्मा खलीदी मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी जे मॉडेल आणले ते मॉडेल समाजासाठी किती कितपत उपयोगी आहे यासाठी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांमध्ये तसेच विद्यार्थ्यांनी चिकित्सक बुद्धीने मॉडेल्स तयार करायला पाहिजे असे सांगून मार्गदर्शन केले.
52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुक्यातील 58 शाळेने विद्यार्थी व शिक्षक सहभाग घेतला असून यामध्ये विद्यार्थी गटातून (6th to 8th 29 व आदिवासी 1) दिव्यांग विद्यार्थांनी 5 मॉडेल चे सादरीकरण केले आणि 9th to 12 वर्ग 26 मॉडेल तसेच शिक्षक गटातून 3 मॉडेल परिचर 3 मॉडेलची प्रदर्शनी करिता ठेवण्यात आलेले आहे.
विज्ञान प्रदर्शनीचे उदाघाट्न धनंजय साळवे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जैनुद्दीन जव्हेरी साहेब माजी आमदार विधान परिषद यांनी फित कापून उद्घाटन करून मॉडेलची पाहणी करण्यात आली व परीक्षण रुरू करण्यात.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रूपाली मामेडवार मॅडम यांनी केले. या कार्यक्रमां च्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या असमा खान खलिदी मॅडम व शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी व पंचायत समिती सर्व पदाधिकारी यांचा सहभाग होता.
0 Comments