2 फेब्रुवारी रोजी साहित्य पुरस्कार वितरण समारंभ आणि कवी संमेलन

 



2 फेब्रुवारी रोजी साहित्य पुरस्कार वितरण समारंभ आणि कवी संमेलन

◾साहित्यिक पुरस्कार वितरण समारंभ, कवी संमेलन आणि भजन मंडळांचा सत्कार समारंभ आयोजित 

◾पत्रकार परिषदेत संगीता धोटे यांची माहिती

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजुरा तालुक्यातील छोटा मार्डा येथील तेजस्विनी बहुउद्देशीय संस्था च्या माध्यमातुन 2  फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वरोरा नाका येथील पत्रकार भवनात साहित्यिक पुरस्कार वितरण समारंभ, कवी संमेलन आणि भजन मंडळांचा सत्कार समारंभ आयोजित करणार असल्याची माहीती संगीता धोटे यांनी पत्रकार परीषदेत दिली. 

या कार्यक्रमात राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे स्वागताध्यक्ष राहणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक अशोक पवार अध्यक्ष तर लेखक कवी आशिष देव उद्घाटक म्हणून राहणार आहे. प्रमुख अतिथि म्हणून डॉ. शाम मोहरकर, डॉ. अनंता सूर, चंद्रपूर पंचायत समिति चे बीडीओ धनंजय साळवे, डॉ. धनराज खानोरकर, इरफान शेख, रत्नमाला भोयर, समाज कल्याण अधिकारी गेडाम, गुरुदेव सेवा मंडळाचे प्राध्यापक देवराव ठावरी उपस्थित राहणार आहेत. शांताबाई बोबडे स्मृती पुरस्कार नागपूरच्या बलवंत भोयर यांना प्रदान केला जाईल. संगीता धोटे यांनी या कार्यक्रमात अधिकाधिक रसिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.




Post a Comment

0 Comments