त्या 12 कामगारांना तात्काळ नोकरीवर घ्यावे अन्यथा परिवारासह आमरण उपोषण करणार
◾पत्रपरिषदेत औद्येागिक क्रांती कामगार संघटनेचा इशारा
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : सी.एस.टी.पी.एस कंपनी मॉर्फत मे. चंद्रपूर जिल्हा रोजनदारी कामगार संस्था चे कंत्राट सुरू आहे. येथील कंत्राटदाराकडे 20 ते 25 कामगार काम करीत आहेत. हे कामगार वर्ष 2017 पासुन काम करत होते. दरम्यान 2023 पासुन येथील कामगारां सोबत मतभेद करून कामगारांचे आर्थिक शोषन करून नोव्हेंबर 2024 मध्ये 12 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले. संबंधित 12 कामगारांना तत्काल नोकरीवर घेण्यात यावे अन्यथा मंगळवार 7 जानेवारी पासून संबंधित कामगार परिवार सोबत आमरण उपोषण करण्याचा इशारा औद्योगिक क्रांती कामगार संघटनेचे रविंद्र चांदेकर ने पत्रकार परिषदेत दिला आहे.
कामावर असलेल्या कामगारांना तात्काल काढण्याचा कोणताच कायदा अस्तीत्वात नाही. उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर 12 जुलै 2020 च्या आदेशानुसार रोजनदारीवर असलेल्या कामगारांना तात्काळ कामावरून काढु नये असे आदेश आहे. संबंधित कामगारांना कामावरून काढण्यात आल्याने कामगारांनी औद्योगिक क्रांती कामगार संघटने कडे तक्रार केली. संघटनेने महानिर्मिती कार्यालय ला त्या कामगारांना तत्काळ नोकरी वर घेण्यासंदर्भात पत्र दिले. तसेच सीटीपीएस मुख्य अभियंता, कामगार कल्याण अधिकारी यांना पत्र देऊन संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने यासंदर्भात विचार करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत संबंधित 12 कामगारांना नोकरी वर घेण्यासंदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. कंत्राटदाराकडून जाणिवपूर्वक या 12 कामगारांना नोकरी वरून काढून टाकण्यात आल्याने कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.
मे. चंद्रपूर जिल्हा रोजनदारी कामगार संस्था च्या कंत्राटदारांने आजपर्यंत केलेले गैरवर्तन महाविजनिर्माती मुख्य प्रबंधक यांच्या समोर आणला. मागिल 10 ते 15 वर्षापासुन लाखो करोडो रूपयांचा भ्रष्टाचार लक्षात घेता औद्योगिक क्रांती कामगार संघटन यावर लक्ष ठेवुन आहे. प्रशासन यावर कोणतेही गंभीरत्याने लक्ष न देता दुर्लक्ष करून स्वत:ची खुर्ची सांभाळीत आहे.
वरील कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेला परीवारावर उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात राज्यशासनाने आणि जिला प्रशासनाने नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या 12 कामगारांना तत्काळ नोकरी वर घेण्याची मागणी केली अन्यथा औद्योगिक क्रांती कामगार संघटने कडून 7 जानेवारी पासून मेजर गेट समोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या दरम्यान औद्योगिक कायदा आस्थापना व सुव्यस्था बिघडल्यास कामगार संघटना जिम्मेदार नाही असेही संघटना अध्यक्ष रविंद्र चांदेकर यांनी सांगीतले.
0 Comments