बल्लारपुर शहरात ख्रिसमस निमित्त भव्य रॅली Grand rally for Christmas in Ballarpur city

 





बल्लारपुर शहरात ख्रिसमस निमित्त भव्य रॅली Grand rally for Christmas in Ballarpur city

◾ख्रिसमस निमित्त निघालेल्या भव्य रॅलीचे बल्लारपुर शहरातील विविध संघटनाद्वारे उत्सफुर्त स्वागत

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : ख्रिसमस व नववर्षाच्या शुभपर्वावर दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी रोमन कॅथलिक चर्च येथून शहरातील बस्ती विभाग येथून गणपती वाडऺ येथून बस स्थानक मार्गा ने संत थाॅमस कॅथेड्रल चर्च रॅली काढण्यात आली. या रॅलीचे स्वागत बल्लारपूरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने करण्यात आले.

सेंट लुक्स चर्च, इंडिया मिशन चर्च, मेथोडिस्ट चर्च व फ्री मेथोडिस्ट चर्च परिसरातून निघालेल्या या रॅली चे स्वागत भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष तथा शासकीय अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सदस्य शेख जुम्मन रिजवी व भाजपाचे माजी जिल्हा सचिव श्रीनिवास चेरकुतोटावार, प्रकाश दोतपल्ली यांनी केले. यावेळी उपस्थित फादर बेन्नी, पास्टर श्याम मातंगी, पास्टर गोपाल, पास्टर जॉन G, पास्टर रवि गोटे, व पास्टर सोलोमन राज यांचेसह उपस्थित ख्रिश्चन बांधवांना पुष्पहार घालून स्वागत केले व त्यांना ख्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या रॅलीमध्ये आगस्टीन बोल्ली, गुडविन अलेक्झेंडर, डी. आनंद, नरेंद्र मसी, ममता विल्सन बोज्जा यांचेही उपस्थितांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सदर रॅलीत रवि हमराज यांनी मसीही गितांची प्रस्तुती केली. या स्वागत सोहळ्यामध्ये भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा महामंत्री शेख अजहर, पत्रकार मनोहर दोतपेल्ली, शेख हुसैन, विलास आमटे, शांतिकुमार गिरमिल्ला, सुर्यवंशी काका, उमेश वाघाडे, संजय मुप्पीडवार, अब्दुल आबिद, सलिम नबी अहमद यांचेसह अनेकांची उपस्थिती  होती.




Post a Comment

0 Comments