भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या शोभायात्रेचे स्वागत.
◾शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शीतपेयाची व्यवस्था
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयाजवळ स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या तैलिक समाज बांधवांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने शीतपेयांचे वाटप करण्यात आले.
तैलिक समाज घडविणारे तेली समाजाचे आराध्यदैवत आणि समाज सुधारक संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तैलिक समाज बांधवांनी शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयाजवळ स्वागत मंच उभारण्यात आला होता.
शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहोचताच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments