अनोळखी मृत्यकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान अनोळखी पुरुष, अंदाजे वय 40 वर्ष हा छोटी पडोली रेल्वे स्टेशन ते विवेकांनद नगर रेल्वे स्टेशनच्या मध्ये अनेाळखी पुरुषाचे प्रत आढळले, अशी माहिती स्टेशन मास्टर प्रमोद शहाणे यांनी दिली. यावरुन पोलिस स्टेशन पडोली येथे मर्ग दाखन करण्यात आलेला आहे. सदर अनोळखी पुरुषाची आजपावेतो ओळख पटलेली नसून नाव, पत्ता किंवा नातेवाईकाबाबत माहिती मिळालेली नाही. सदर मृतक अनोळखी इसमाची ओळख पटविणे आवश्यक आहे.
मृतकाचे वर्णन : अनोळखी पुरुष, वय -अंदाजे 40 वर्ष, रंग -सावळा, बांधा - मजबुत , उंची – 5 फुट 3 इंच, अंगात फीकट आकाशी रंगाची टी शर्ट ,काळया रंगाचा बरमुडा, चेहरा गोल, दाडी - मिशी व डोक्याचे केस काळे. सदर अनोळखी मृतकाबाबत कोणालाही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पडोली पोलिसांनी केले आहे.
1 Comments
कृपया मृताचा फोटो पाठवावा माझा मुलगा बेपत्ता आहे.... दुर्दैवाने तो नसावा ईश्वराजवळ एवढी माझी प्रार्थना आहे... माझा मुलगा सुखरूप असावा परंतु माझ्या मनात पाल चुकत आहे कृपया मला हेल्प करावी... माझा मोबाईल नंबर आहे 98 34 14 35 94... 84 59 40 22 25
ReplyDelete